लातूर : शाळेच्या १०० यार्डात तंबाखूविक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशनव्दारे प्रसारीत करताच शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ५८१ माध्यमिक शाळांना शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्या आहेत़ अन्न व औषध प्रशासनाने १३ पानटपऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे़ मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालयातील कॅन्टीन धारकांना महाविद्यालयाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे़ राज्याला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, पुरवठा करण्यावर बंदी कायदा (सीओटीपीए २००३) या कायद्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयाच्या १०० मीटर परिसरातून तंबाखू हद्दपार करण्यात आली होती़ परंतु, सध्या का कायदा दुर्लक्षित झाल्याने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात टपऱ्यांची गर्दी झाली आहे़ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने छापताच शिक्षण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले़ माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ़ गणपत मोरे यांनी जिल्ह्यातील ५८१ शाळांना नोटीस बजावल्या असून, ज्या शाळेच्या परिसरात अशा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात असेल, त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना शाळेच्या मुख्याध्यपकांना दिल्या आहेत़ त्यानुसार मुख्याध्यापकाकडे कार्यवाहीचा चेंडू शिक्षण विभागाने टोलवला आहे़ आता मुख्याध्यापक कार्यवाही करणार का? अशीही चर्चा होत आहे़ अशा शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत़ मांजरा आयुर्वेदिक मेडीकल महाविद्यालय व रुग्णालायतील कॅन्टीनमध्ये तंबाखुजन्य पदार्थ मिळत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असता महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने संबंधीत कॅन्टीनधारकास नोटीस बजावली आहे. यापुढे अशी खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ कॅन्टीन धारकाने झालेल्या प्रकाराबबत माफी मागितली असून या पुढे असे होणार नाही याबाबत हमी दिली आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील ५८१ शाळांच्या मुख्याध्यापकाकडे नोटिसा बजावल्या आहे. शाळा परिसरात पानटपऱ्या असणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे शिक्षणाधिकारी डॉ़ गणपत मोरे म्हणाले. (प्रतिनिधी)
५८१ शाळांना नोटिसा !
By admin | Published: March 02, 2015 12:43 AM