लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ठाणे पोलीस, वैध मापे विभाग यांच्या तपासणीत अदालत रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोलपंपात मोठ्या प्रमाणात मापात पाप होत असल्याचे समोर आले होते. हा पंप टर्मिनेट (करार रद्द) का करण्यात येऊ नये, अशी नोटीस इंडियन आॅइल कॉर्पोरेशनने बजावली आहे. ठाणे, मुंबईतील पेट्रोलपंपात इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून ग्राहकांना कमी इंधन दिले जात असल्याचे समोर आले होते. पेट्रोलपंपात चीप बसविणाऱ्या आरोपींनी राज्यातील विविध शहरांतील पंपांमध्ये अशा चीप बसविल्याची माहिती ठाणे पोलिसांना दिली होती. या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात शहरातील चार पेट्रोलपंपांची ठाणे गुन्हे शाखा, वैध मापे विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त तपासणी करण्यात आली होती.
चुन्नीलाल पंपाला करार रद्दची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 1:03 AM