वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर अतिक्रमण करुन वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या पंढरपुरातील व्यवसायिक व हातगाडी चालकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा बजावल्या.
येथील तिरंगा चौक व विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात महामार्गालगत रस्त्यावर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत. वारंवार सांगूनही रस्त्यावर पुन्हा रस्त्यावर येत असल्याने वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी पंढरपुरातील तिरंगा चौक व विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरातील व्यवसायिक व हातागाडी चालकांना नोटिसा दिल्या.