चाँद पाशाविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, गंभीर दुखापत करून लुटमार करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी गंभीर स्वरूपाची ९ गुन्हे दाखल आहेत. जेलमधून सुटल्यावर तो पुन्हा गुन्हे करतो. चाँद पाशा याला २०१७ साली शहरातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते; मात्र तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात येत असे. त्याच्या गुन्हेगारी कृत्याचा आलेख सतत चढत असल्याचे पाहून पोलीस आयुक्तांनी त्याला स्थानबद्ध केले. पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, डॉ. गणपत दराडे, हवालदार द्वारकादास भांगे, महादेव दाणे, महिला कॉन्स्टेबल आशा केंद्रे, दीपाली सोनवणे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात रवानगी केली. (फोटोसह)
कुख्यात गुंड चाँद पाशा एमपीडीएखाली हर्सूल जेलमध्ये स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:05 AM