शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे : जयंत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 7:15 PM

आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद : आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार पाटील यांच्या हस्ते मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मधुकरअण्णा मुळे यांना मंगळवारी देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, आज तरुण पिढी शिक्षणापेक्षा धर्माकडे अधिक ओढली जाते आहे. धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर हे घडत असते. दंगली होणार नाहीत, शांतता राहील, असा विश्वास निर्माण करू शकलो, तर आपल्या देशातही विदेशी गुंतवणूक होऊ शकते. हातांना आज काम नाही. त्यामुळे तो आरक्षणासाठी आग्रही दिसतोय. त्यासाठी लाखोंचे मोर्चे निघू लागले आहेत. 

‘नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या ज्या तरुणांनी केल्या ते तरुण पाहिल्यानंतर आणि अलीकडे नालासोपाऱ्यात ज्या तरुणकडे शस्त्रास्त्रे सापडली त्यावरून असे लक्षात येते की, अशा धाडसाला कुठेतरी पाठबळ मिळतेय. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाची पाळेमुळे जालन्यात सापडतात, हे सारेच आश्चर्यजनक असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरच्या वर केल्याशिवाय यांना झोप लागणार नाही, असा टोलाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लगावला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण