औरंगाबाद ः येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात (एमएनएलयू) बी.ए. एलएलबी. (हाॅनर्स), बीबीए एलएलबी(हाॅनर्स), एलएलएम पीएच.डी तसेच एलएलडी हे चार अभ्यासक्रम सध्या सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठामार्फत बीबीए एमबीए (इंटिग्रेटेड कोर्स इन लाॅ ॲण्ड मॅनेजमेंट), एमबीए (कोर्स एडमिनीस्ट्रेशन ॲण्ड फायनान्सीयल सर्व्हीसेसे), एमए (लाॅ, फाॅरेन्सीक सायन्स ॲण्ड टेक्नालाॅजी) तसेच एमए (पल्बिक पाॅलिसी) हे अभ्यासक्रम सुरु करण्याचे नियोजन आहे.
मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ औरंगाबाद येथे कार्यान्वीत झाल्यावर या विद्यापीठाचे विविध इमारतीच्या बांधकामासाठी कांचनवाडी परिसरातील गट क्रं. १९ मध्ये अस्तित्वात असलेले २४ सदनिका व ६ बंगले व ८ एकर जमीनीसह विद्यापीठाकडे सरकारने हस्तांतर केले. लागूनच असलेले गायरान ९ एकर आणि त्याशेजारची वाल्मी या संस्थेची ३३ एकर जमिन ही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.यापूर्वी इमारतीच्या बांधकामासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये रुपये १४९.७२ कोटी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ९८ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत मिळाला. २०१८-२०२३ या कालावधी मध्ये प्रति वर्ष रुपये ५ कोटी रूपयांचे विद्यापीठाला अनुदान मिळाले आहे.
विविध इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर१६ जानेवारी रोजी २२२.६३ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळली. या निधीतून महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील प्रशासकीय इमारत, ग्रंथालय इमारत व लेक्चर हॉल (अकॅडमिक ब्लॉक) चे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत विशेष बाब म्हणून विद्यापीठाच्या ग्रंथालयासाठी रुपये २० कोटी निधी मंजूर झाला असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधीचा प्रयत्नएमएनएलयू विद्यार्थ्यांच्या काळानुरुप गरजा लक्षात घेता व भविष्यातील संधीची पुर्तता करण्याकरिता या विद्यापीठात अपरंपारीक व बृह विद्या शाखीय अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगार व व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध देण्यात येतील. नजीकच्या काळात हे विद्यापीठ विधी शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार व अग्रगण्य ज्ञानकेंद्र म्हणुन नावारुपास येईल. असे कुलगुरू प्रा. डॉ. के.व्ही.एस. सर्मा यांनी सांगितले.