जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : केंद्रीय क्रीडामंत्री आणि माजी पदक विजेते नेमबाज आॅलिम्पियन राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘खेलो इंडिया’ या योजनेत आता तलवारबाजी खेळाचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रतिभावान २५ मुले आणि २५ मुलींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे सचिव बशीर अहमद खान यांनी दिली.विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात ‘खेलो इंडिया’ या योजनेसाठी सिलेक्शन ट्रायल्स सुरू आहेत. या ट्रायल्ससाठी बशीर खान यांचे औरंगाबादेत आगमन झाले आहे. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने तलवारबाजी खेळाचा खेलो इंडियात समावेश केला आहे. खेलो इंडियासाठी औरंगाबादेत साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात १४ व १७ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटात दोनदिवसीय सिलेक्शन ट्रायल्स होत आहे. या ट्रायल्समधून प्रत्येक गटातील अव्वल ठरणाऱ्या एकूण २५ मुले अणि २५ मुलींची पुढील तीन वर्षांसाठी ‘खेलो इंडिया’ या योजनेसाठी निवड करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूंवर प्रत्येकी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात खेळाडूंची निवास, आहार, शिक्षण आणि फॉरेन एक्सपोजर या बाबींचाही समावेश असणार आहे.’’महाराष्ट्रातील तलवारबाजी खेळाच्या प्रगतीविषयी बशीर खान यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, अशोक दुधारे आणि उदय डोंगरे यांच्या प्रयत्नांमुळे भारतात तलवारबाजीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, मणिपूर, छत्तीसगडचा समावेश आहे. महाराष्ट्राचे १७ हजार खेळाडू तलवारबाजी महासंघाशी संलग्नित आहेत. औरंगाबादमध्ये क्लब सिस्टिम तलवारबाजी खेळासाठी पोषक ठरत असून, येथील चांगल्या वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत आहेत. राजीव मेहता हे भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष झाल्यापासून या खेळाचा आलेख उंचावत आहे. मेहता यांनी महासंघाशी संलग्नित राज्य संघटनांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.महासंघातर्फेही विविध वयोगटाच्या स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन होत आहे. खेळाडूंच्या प्रगतीचा आलेखही उंचावत आहे. कॉमनवेल्थ आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतही खेळाडू पदकविजेती कामगिरी करीत आहेत. सॅटेलाईट स्पर्धेत तामिळनाडूच्या भवानी देवी हिने रौप्य पदक जिंकले तर करणसिंग पाचव्या क्रमांकावर राहिला. तलवारबाजी या खेळाला भारत सरकारने खेळांच्या टॉप प्रायोरिटीत मान्यता दिली आहे. त्यामुळे खेळाडूंनाही आता रेल्वे, पोलीस आदी अनेक ठिकाणी नोकºया मिळत आहेत.’’साहित्य महागडे ठरल्याचा बसतोय फटकातलवारबाजी खेळाला साहित्य महागडे असल्याचा मोठा फटका बसतोय हे बशीर खान यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘‘१९७४ पासून या खेळास भारतात सुरुवात झाली. मात्र, खºया अर्थाने त्याला १९९४ नंतर वेग मिळाला. इतर खेळांच्या तुलनेत तलवारबाजी हा लोकप्रिय नाही. हा खेळ मागे असण्यास याचे मिळणारे महागडे साहित्यही जबाबदार आहे. या खेळाचे दर्जेदार साहित्य मिळण्यास ५0 हजार रुपये लागतात. महासंघ प्रत्येक खेळाडूला हे साहित्य उपलब्ध करून देऊ शकत नाही. यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा व प्रायोजक मिळवून देण्यात साह्य करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे व राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची उपस्थिती होती.औरंगाबादला तलवारबाजीची राष्ट्रीय अकॅडमीऔरंगाबादला तलवारबाजी या खेळाच्या राष्ट्रीय अकॅडमीस मान्यता मिळाली आहे. देशभरात ५ ठिकाणी अशा अकॅडमी उभारण्यात येणार आहे. त्यात औरंगाबादसह सोनीपथ व छत्तीसगड येथे राष्ट्रीय अकॅडमी स्थापन करण्यास मान्यता मिळणार आहे. या अकॅडमीसाठी सिलेक्शन ट्रायल आयोजित करून खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. ही अकॅडमी १ जुलैपासून सुरू होईल, अशी माहितीही बशीर खान यांनी दिली.सरकारकडून २ कोटी ९0 लाख रुपयेएका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी किमान ४0 ते ५0 लाख रुपये लागतात. नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारत सरकारतर्फे विविध आंतरराष्ट्रीय तलवारबाजीसाठी २ कोटी ९0 लाख रुपये मिळाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आता तलवारबाजी खेळाचाही ‘खेलो इंडिया’त समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:34 AM
केंद्रीय क्रीडामंत्री आणि माजी पदक विजेते नेमबाज आॅलिम्पियन राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘खेलो इंडिया’ या योजनेत आता तलवारबाजी खेळाचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रतिभावान २५ मुले आणि २५ मुलींचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे सचिव बशीर अहमद खान यांनी दिली. विद्यापीठ परिसरातील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात ‘खेलो इंडिया’ या योजनेसाठी सिलेक्शन ट्रायल्स सुरू आहेत. या ट्रायल्ससाठी बशीर खान यांचे औरंगाबादेत आगमन झाले आहे.
ठळक मुद्देअ. भा. सचिव बशीर खान : तीन वर्षांसाठी होणार खेळाडूंची निवड, मिळणार प्रत्येकी ५ लाख