छत्रपती संभाजीनगर :पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक असते. हे व्हेरिफिकेशन आता तीन ते आठ दिवसांत करणे आवश्यक आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांत पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यासाठी आपण भरलेला फॉर्म योग्य असावा, सर्व कागदपत्रे व्यवस्थितरीत्या दिल्यास प्रोसेस होऊन ती प्रकिया सोपी होते. त्याच तारखेला पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पाठविली जाते. विलंब करू नये; अन्यथा तुमच्या प्रक्रियेस उशीर होण्याचा प्रकार समोर आलेला आहे.
तीन दिवसांत होणार पोलिस व्हेरिफिकेशनतुम्ही भरलेल्या अर्जावरून तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे पडताळणी व तुम्ही जोडलेल्या मूळ कागदपत्रांची पाहणी करून त्याच दिवशी तुमचा अर्ज सबमिट झाल्याच्याच दिवशी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी तुमचा अर्ज पाठविला जातो. ऑनलाइन प्रक्रिया असल्याने त्याचा अर्जदारांना फायदाच झालेला आहे. त्वरित संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
झटपट मिळणार पासपोर्टठरवून दिलेल्या नियमांनुसार तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्यास तुमचे काम कुठेही अडविले जात नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासपोर्ट त्वरित मिळण्यास मदत होते.
सात महिन्यांत एक हजार पासपोर्टप्रत्येक दिवसाला ८० अर्जांची तपासणी केली जाते त्यात काही अर्जांची त्रुटी असल्यास त्याला पुन्हा अर्ज भरावा लागतो किंवा तत्काळ अर्जाच्या त्रुटीची पूर्तता करावी लागते. त्यातील योग्य व्हेरिफिकेशननंतर तत्काळ पासपोर्ट तुमच्या घरी टपालामार्फत येऊ शकतो. अनेकदा अधिक नागरिकांना पासपोर्ट सुलभरीत्या मिळावा म्हणून प्रयत्न केले जातात. परंतु, काही त्रुटी राहिल्यास मनस्ताप होण्याचे प्रकारही समोर येतात. हजाराच्या जवळपास पासपोर्ट नागरिकांना मिळाले आहेत.
पोलिस व्हेरिफिकेशनसाठी काय कागदपत्रे लागतात?भारतीय असल्याचा व नाव, जन्मतारखेचा उल्लेख असलेली शालेय कागदपत्रे आणि रहिवासी, लाईटबिल, वाहन चालविण्याचा परवाना, बँक खाते, आधार कार्ड तसेच तुमची ओळख पटेल अशी कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक आहेत.
योग्य कागदपत्रांची तपासणी केली जातेव्यक्तीची ओळख व भारतीयत्वाचा पुरावा महत्त्वाचा असतो. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची खातरजमा केली जाते. ठाण्यात संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर विचारपूस करावी लागते.- पोलिस अधिकारी
अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांत त्रुटी नकोअर्जदारांनी पासपोर्टसाठी केलेल्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य असावीत तरच ती पुढे अपलोड केली जातात. काही चुका असल्यास ते डॉक्युमेंट पुढे जात नाही.- पासपोर्ट सेवा केंद्र अधिकारी