छत्रपती संभाजीनगर : कामगार कार्यालयात सप्टेंबरपर्यंत नोंदणी असलेल्या मजुरांनी अर्ज केल्यास गोडाऊनवर सुरक्षा कीट दिली जाणार आहेत.
शासनाने हंगामी कामगारांसाठी योजना आणली असून, त्यातून मजूर व त्याच्या पाल्यांचा कसा फायदा होईल, हे पाहिले जाते. कामगारांना आरोग्य विमा तसेच पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, शालेय पुस्तके आणि इतर फायद्यांसह घरकुलाचीही त्यात तरतूद आहे. ही योजना कशी बळकट होईल, हा शासनाचा उद्देश असला तरी ती राबविण्यात कठीण प्रसंग येत आहेत. आऊट सोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांकडून कामगार उपायुक्त कार्यालयाचा कारभार चालत असून, त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. मोजकेच लोक कार्यालयात काम करीत आहेत, असे येणाऱ्या कामगारांना सातत्याने सांगण्यात येते.
शिष्यवृत्तीचा घोळ संपेना...मुलांच्या शिष्यवृृत्ती तसेच मेडिक्लेमची प्रकरणे अधिकारी निकाली काढत नसल्याने नाराजी आहे. नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचे लाभ देण्यास विलंब लावणे योग्य नाही.- कैलास जुमडे, कामगार नेता
खात्यावर पैसे टाका...दुपारचे जेवण देण्याची योजना शासनाने बंद केली आहे. नोंदणीकृत मजुरांच्या खात्यात शासनाने जेवणाचे दोन वेळचे पैसे जमा करावेत, अशी मागणी आहे.- भाऊसाहेब नवगिरे, कामगार नेता
दलालाकडे जाऊ नकाऑनलाइन फाॅर्म भरणे, जनतेला मदत करणे, हे काम केले जात असले तरी कामगारांनी कुठेही फसलो जाणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आता पावती दाखवून कीट मिळत असल्याने दलालांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त