शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 1:20 AM

गळती आणि चोरीही मोठी : सर्वाधिक पाणीपट्टी भरणाऱ्या शहराला पुरवठा मात्र तोकडा; उपलब्ध असूनही पाच दिवसांआड मिळते पाणी

- ऋचिका पालोदकरऔरंगाबाद : राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरणाºया औरंगाबादकरांना पाणी मात्र कमीच मिळते. शहरात अनधिकृत नळांची संख्या जवळपास एक लाखावर असून, पाण्याची गळती तब्बल १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे दर वाढविण्याआधी या दोन प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.औरंगाबादमध्ये पाणीपट्टीचा दर वर्षाला ४०५० रुपये एवढा असून, तो पुणे- मुंबईपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाते. पाणीपट्टी एवढी जास्त असूनही राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादचा पाणीपुरवठा मात्र अगदीच तोकडा आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात असून, दररोज शहराला २५० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. यापैकी जायकवाडी धरणातून शहराला १३० दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. मुख्य पाईपलाईनला अनेक ठिकाणी असलेल्या गळतीमुळे १० दशलक्ष घनमीटर पाण्यावर औरंगाबादकरांना दररोज पाणी सोडावे लागते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेला दरवर्षी अंदाजे ६० कोटी रुपये एवढा खर्च करावा लागतो. शहरातील अधिकृत नळांची कागदोपत्री संख्या १ लाख ३० हजार असली तरी शहरात १ लाखापेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, तसेच शहराची थकीत पाणीपट्टी ४०० कोटींच्या घरात आहे. पाच दिवसांआड पाणी मिळणारे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे सर्वसामान्य औरंगाबादकर पाण्याची किंमत चांगलीच जाणतात. त्याचवेळी अवैध नळ कनेक्शन घेऊन खुलेआम पाणीचोरी करणारे आणि वरून दमदाटी करणाऱ्यांची संख्याही येथे कमी नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढविण्याआधी ही गळती आणि अवैध नळकनेक्शनवर अंकुश आणला जावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.आधी पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावी करा : औरंगाबाद शहरातील ५० टक्के नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आणि दमदाटी करून पाणी घेणाºयांना पाणीदरवाढ लागूच होत नाही. तुम्ही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करू शकत नाही, त्यांच्याविरुद्ध तुम्ही कायदा वापरत नाही. कोणी अधिकारी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलाच, तर अन्य लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत, लगेच त्या प्रकरणावर स्टे आणला जातो. मग पाणीदरवाढ करून उपयोग काय? मुळात पाणीपुरवठा करणारी आपल्या देशातील यंत्रणा प्रभावी नाही. पाण्याचे कोणतेही मोजमाप होत नाही. याची एक योग्य पद्धत जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत पाणीदरात वाढ करून उपयोग नाही. -डॉ. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञलोकांमध्ये जागृती वाढणे गरजेचे : १० दशलक्ष घनमीटर पाणी दररोज वाया जाते, असे म्हणता येणार नाही. कारण हा ‘अझ्युम लॉस किंवा टेक्निकल लॉस’ म्हणून गृहीत धरण्यात येतो. जेवढी लांब पाईपलाईन असेल, तेवढा हा लॉस जास्त गृहीत धरतात. पाणीचोरी, अनधिकृत नळ कनेक्शन घेणाºयांवर आम्ही कायम कारवाई करीतच असतो. अनेकदा पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करतो; पण जोपर्यंत यामध्ये लोकसहभाग असणार नाही, तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहतील. आपल्या बाजूचा माणूस जर अवैध पद्धतीने नळ घेत असेल, तर ही गोष्ट नगरसेवक, मनपा कर्मचाºयांपर्यंत कळविणे, हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे; पण या विरुद्ध कोणीही बोलत नाही. हा प्रश्न एकट्या प्रशासनाचा नसून सामाजिक प्रश्न आहे. - हेमंत क ोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपाऔरंगाबाद शहराची लोकसंख्या 17,00,000थकीत पाणीपट्टी 400 कोटीअधिकृत नळांची कागदोपत्री संख्या 1,30,000पाण्याची शहराला आवश्यकता आहे. 250 दशलक्ष घ.मी.पाणी शहराला जायकवाडी धरणातून मिळते 130 दशलक्ष घ.मी.पाण्याची गळती 10 दशलक्ष घ.मी.