शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

आता एकच लक्ष्य... आॅलिम्पिकमध्ये खेळायचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:57 AM

घरची परिस्थिती बेताचीच. पण आईवडिलांनी कॅन्टिन चालवून मुलीचा नेमबाजीचा छंद जोपासला. ऊसनवारी करून तिच्या स्वप्नांना बळ दिले. आईवडिलांच्या कष्टाची सतत जाणीव ठेवत आंतरराष्ट्रीय नेमबाज म्हणून तिने स्वत:ला सिद्ध केलं. पुण्यात पार पडलेल्या खेलो इंडियात तिने सुवर्णवेध घेतला. हे यश पदरात पडलेलं असताना शिवछत्रपती पुरस्काराची थाप मिळाली. औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिने आता तिने पंख आणखी विस्तारलेत. ‘एकच लक्ष्य... आलिम्पिक फक्त’ म्हणत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा निश्चय हर्षदाने केला आहे.

ठळक मुद्देदेशाचे प्रतिनिधित्व करण्याचा नेमबाज हर्षदा निठवेचा निश्चय : ‘खेलो इंडिया’तील सुवर्ण वेधानंतर शिवछत्रपती पुरस्काराची मिळाली थाप

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : घरची परिस्थिती बेताचीच. पण आईवडिलांनी कॅन्टिन चालवून मुलीचा नेमबाजीचा छंद जोपासला. ऊसनवारी करून तिच्या स्वप्नांना बळ दिले. आईवडिलांच्या कष्टाची सतत जाणीव ठेवत आंतरराष्ट्रीय नेमबाज म्हणून तिने स्वत:ला सिद्ध केलं. पुण्यात पार पडलेल्या खेलो इंडियात तिने सुवर्णवेध घेतला. हे यश पदरात पडलेलं असताना शिवछत्रपती पुरस्काराची थाप मिळाली. औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिने आता तिने पंख आणखी विस्तारलेत. ‘एकच लक्ष्य... आलिम्पिक फक्त’ म्हणत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा निश्चय हर्षदाने केला आहे.खेलो इंडिया स्पर्धेतील दमदार कामगिरी आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदाने तिच्या जडणघडणीविषयी ‘लोकमत’शी संवाद साधला. हर्षदा म्हणाली, ‘‘आता भारतीय संघ निवडण्यासाठी नवी दिल्ली येथे निवड चाचणी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची तयारी सध्या मी करीत आहे. या स्पर्धेसाठी मी मंगळवारी रवाना होत आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघात स्थान निश्चित करण्याचे माझे सर्वात आधी लक्ष्य आहे. २0२0 च्या आॅलिम्पिकच्या कोटा मिळवण्यासाठी पात्रता स्पर्धा अजूनही बाकी आहेत. त्यामुळे मला अजूनही संधी असून तिचे सोने करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करुन आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा माझा मानस आहे. ही संधी कदाचित हुकल्यास २0२४ आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे तर माझे लक्ष्यच आहे.’’नेमबाजी कशी आली? याविषयी बोलताना हर्षदा म्हणाली, ‘‘इयत्ता सातवीत असताना बॅडमिंटन खेळण्यासाठी एमजीएममध्ये वडिलांसोबत मी गेले होते. त्या वेळेस बॅडमिंटन कोर्ट बंद होता; परंतु शूटिंग रेंजमधील आवाज सुरु होता. त्यावेळेस शूटिंग रेंज पाहू या उद्देशाने मी वडिलांसह शूटिंगरेंजमध्ये पोहोचले. तेव्हा प्रशिक्षक संग्राम देशमुख यांनी आम्हाला नेमबाजी खेळीची माहिती दिली आणि या खेळासाठी योग्य उंची असून हा खेळ सुरु करण्याचा सल्ला दिला. त्या वेळेस या खेळाची मला माहितीही नव्हती. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत जसजशी माझी कामगिरी उंचावत गेली त्या वेळेस हा खेळ खूप खर्चिक असल्याचे लक्षात आले. २0१२ मध्ये पिस्टलची किंमत ७५ ते ८0 हजारांदरम्यान होती. अवघ्या सहा महिन्यातच पुणे येथील राज्य आंतरशालेय स्पर्धेत मी कास्यपदक जिंकले आणि पाचच दिवसांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय बनावटीचे पिस्टलसह मी सुवर्णपदक जिंकले. माझी कामगिरी पाहुन वडिलांनी पार्डिन हे पिस्टल मला खरेदी करुन दिली. कामगिरीचा ग्राफ उंचावल्यामुळे माझा ओढा या खेळाकडे जास्त वाढला.उसनवारी करुन मुलींचा जोपसला छंदहर्षदाची घरची परिस्थिती साधारणच आहे. वडील सदानंद निठवे आणि आई श्रद्धा निठवे हे औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात कॅन्टिन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतानाच मुलगी हर्षदाचा छंद जोपासत आहेत. विशेष म्हणजे तिला पहिली पिस्टल त्यांनी नातेवाईकांकडून उसणवारी घेऊन ७५ हजारांची पिस्टल तिला घेऊन दिली होती. तसेच आतापर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा खर्चदेखील ते उसणवारी करुनच करीत असतात. खर्चिक खेळ पाहता तिचे आॅलिम्पिकचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्पॉन्सर्सची मदत आवश्यक असल्याची भावना हर्षदाचे वडील सदानंद निठवे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.चांगल वाईट दोन्हींची किनार२0१६ मध्ये गबाला येथील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली. स्पर्धेला रवाना होण्याआधीच खांद्याला दुखापत झाली; परंतु देशाकडून खेळायचेच ही जिद्द मनात होती. दुखापतीनंतरही आपण चौथ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली याचे समाधान वाटते. त्यानंतर कामगिरी उंचावत चारच महिन्यानंततर झालेल्या २0१७ मध्ये गबाला येथील सीनिअर वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवले हा कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण असल्याचे हर्षदा सांगते. २0१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत कास्यपदक हुकल्याचीही खंत असल्याचे तिने सांगितले.हर्षदाला हवी पाँर्इंट टू टूची कॅलिबर पिस्टल१0 मीटरप्रमाणेच २५ मीटर एअर पिस्टलमध्ये खेळण्याची हर्षदाची इच्छा आहे. त्यामुळे या दोन इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकण्याची संख्या वाढेल तसेच आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची लवकर संधी मिळू शकते. तिची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे. २५ मीटर एअर पिस्टलसाठी आवश्यक अशा कॅलिबर पिस्टलची किंमत अडीच लाख रुपयापर्यंत आहे. ती घेणे तरी तिला शक्य नाही. त्यामुळे स्पॉन्सर्स मिळाल्यास ही आपल्याला पदकांची संख्या वाढवण्याची संधी मिळेल, असे तिला वाटते.८० पदके घातली खिशात...२0१३ पासून राष्ट्रीय स्पर्धा खेळू लागली आणि २0१५ सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक कास्य आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले. याच वर्षी कुवैत येथील आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २0१६ मध्ये गबालातील अजरबैजान येथे झालेल्या ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत सांघिक सुवर्णपदक पटकावताना वैयक्तिक चौथा क्रमांक पटकावला. याच वर्षी पुणे येथील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तर हर्षदाने ७ पदके जिंकण्याचा पराक्रम केला. यूथ गटात तिने वैयक्तिकमध्ये सुवर्ण, ज्युनिअर गटात रौप्य आणि सीनिअर सिव्हिलियनमध्ये पदक जिंकले. त्यानंतर यूथ, ज्युनिअर, सीव्हिलियन आणि सीनिअर या सांघिक प्रकारात सुवर्णपदकांचा चौकार मारला. २0१७ या वर्षी जून महिन्यात हर्षदाने सीनिअर वर्ल्डकपमध्येदेखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला. २0१८मध्ये केरळ यंदाचे वर्ष तर हर्षदासाठी दुहेरी आनंदाचा क्षण ठरला. प्रथम तिने पुणे येथे झालेल्या खेलो इंडियामध्ये २१ वर्षांखालील वयोगटात १0 मीटरमध्ये एअर पिस्टल प्रकारात गोल्डन कामगिरी करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. तसेच तिला राज्य शासनातर्फे प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत तिने सहा आंतरराष्ट्रीय पदकांसह जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ८0 पदकांची लूट केली आहे.---हर्षदा खूप मेहनती आणि जिद्दी आहे. एखादे लक्ष्य समोर ठेवल्यास ती पूर्ण करते. खराब कामगिरी झाली, तरी त्यानंतर तिच्यात जबरदस्त मुसंडी मारण्याची आणि आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता आहे. तथापि, तिला चांगल्या कामगिरीत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.संग्राम देशमुख (प्रशिक्षक)