शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

आता आंध्रात पाटोदा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 12:49 AM

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. या गावाने राबविलेले विविध उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्याचा निर्धार या मंडळाने व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा गावाला आंध्र प्रदेश शिष्टमंडळाने विविध विकासकामांची पाहणी केली. पाटोदा गावात लोकसहभागातून विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील ग्रामपंचायतीचा संगणकीकृत कारभार, वीज बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घरासमोर एक झाड, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कॅरिबॅग वापरावर बंदी, गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व व्यसनापासून ग्रामस्थांनी दूर राहावे, यासाठी गुटखा व दारूविक्रीवर बंदी, संपूर्ण ड्रेनेजलाईन व गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, आगाऊ कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत संसारोपयोगी साहित्याची भेट, संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, गावात सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे रस्ते, महिला, पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, कचरा साठवण्यासाठी डस्टबिन, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार, घराच्या मालकी हक्कात पती-पत्नीची नावे, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या, एटीएम कार्डद्वारे नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा तसेच ग्रामपंचायतीद्वारे गावातील सर्व कुटुंबियांना २० लिटर शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविण्यात येत आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, नागरिकांना संगणकीकृत प्रमाणपत्राचे वाटप, मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत, जातीय सलोखा, धार्मिक, सामाजिक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग, गावाच्या विकासासाठी एकजूट दाखविणारे नागरिक आदींमुळे पथकातील सदस्यही अचंबित झाले होते.पाटोदाने राबविलेले विविध कल्याणकारी उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष डॉ. कोडेलासिवा प्रसादराव व आमदारांनी व्यक्त केले. पादोटा गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे पथकातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या पथकात महिला व बालकल्याणमंत्री किमिडी मृणालिनी, आ. कगिंथा व्यंकटराव, आ.येलुरी संबा सिवाराव, आ. जयनागेश्वर रेड्डी, डी.ए.सत्यप्रभा, गता मसला, अन्नाम सतीश प्रभाकर, गी श्रीनिवासुलू, डॉ. एम.गेयानंर, पमेंटसा विष्णुकुमार, मथुमुला रेड्डी, विधानसभा सचिव के.गुरुमूर्ती, जनसंपर्क अधिकारी बोपन्ना रविकुमार आदींचा समावेश होता. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कदम, शिक्षणाधिकारी छायादेवी कवडदेव, विस्तार अधिकारी एस.डी.साळुंके, स्वच्छ भारत अभियानचे राज्य समन्यवक तथा माजी सरपंच भास्करराव पा.पेरे, सरपंच कल्याण पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी आर.डी.चौधरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम आदींनी गावात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पथकातील सदस्यांना दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंदनसिंग मेहर, किशोर पेरे, जनार्दन भाग्यवंत, लहू मुचक, अण्णासाहेब पेरे, जगन्नाथ पेरे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.