मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महावेध प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आद्रता, वाºयाचा वेग आणि दिशा याचा अचूक अंदाज घेता येणार आहे. १५ आॅगस्टपासून ही हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.राज्यामध्ये सार्वजनिक खाजगी भागिदारीतून प्रत्येक महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याचा व हवामान विषयक विविध घटकांची दैनंदिन माहिती अचूक गोळा व्हावी, या उद्देशाने महावेध प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस होता. या प्रकल्पाद्वारे प्राप्त होणाºया हवामान विषयक माहितीचा मुख्यत: पीक विमा योजना तसेच शेतकºयांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी, कृषी व हवामान क्षेत्रात संशोधनासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोग व्हावा, या हेतुने कृषी विभागाने डिसेंबर २०१६ मध्ये महावेध प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागिदारीतून ‘बांधा, मालक व्हा आणि चालवा’ या तत्त्वावर अंमलबजावणीकरीता निविदा प्रसिद्ध केली होती.या निविदा प्रक्रियेतून मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीची महावेध प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड करण्यात आली. या संस्थेने परभणी जिल्ह्यामध्ये ३८ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र बसविले आहेत. १५ आॅगस्ट २०१७ पासून ही स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या केंद्राद्वारे जवळपास २० दिवसांपासून तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आद्रता, वाºयाचा वेग आणि दिशा या हवामान घटकाची माहिती दर १० मिनिटांनी डेटा लॉगरमध्ये नोंद घेतली जात आहे. ही माहिती एका तासाने सर्व्हरला पाठविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या हवामानाची अचूक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना हवामान विषयक अचूक मार्गदर्शन करण्यासाठी या माहितीचा मोठा उपयोग होणार आहे. तसेच महावेध प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारी हवामानविषयक माहितीचा शासन अर्थसहाय्यित पीक विमा योजनेकरीता अधिकृत हवामान विषयक माहिती म्हणून उपयोग करणार आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली सर्व हवामान केंद्र पीक विम्याच्या खरीप व रब्बी हंगामाकरीता स्वतंत्रपणे अधिसूचित करण्यात येणार आहेत. पीक विमा योजनेत सहभागी होणाºया सर्व विमा कंपनींना अचूक हवामान विषयक माहिती पाहिजे असल्यास मे.स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्याकडून विहित दराने खरेदी करावी लागणार आहे. त्यानंतरच ही कंपनी स्वयंचलित हवामान केंद्रातील माहिती विमा कंपनीला देऊ शकणार आहे. प्रत्येक मंडळात स्वयंचलीत हवामान केंद्र सुरू झाल्याने जिल्ह्याच्या हवामानाचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.
आता हवामानाचा अचूक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:59 AM