लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे. आयुक्तांनी गुरुवारी दुपारी नारेगाव येथील १३ सदस्यीय शिष्टमंडळाशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काहीही साध्य न झाल्यामुळे २ मार्च रोजी दुपारी २.३० वा. पुन्हा बैठक होणार आहे.शहरातील होळी आणि धुळवड दुर्गंधीयुक्त कचºयाच्या ढिगाºयाच्या साक्षीने होणार आहे. दरम्यान, मिटमिटा येथील नागरिकांना आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी ४ वा. चर्चेसाठी बोलावले होते; परंतु तेथील नागरिकांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला. आज झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी एन.के. राम, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची उपस्थिती होती. डॉ. भापकर यांनी सांगितले की, आज दिवसभर नारेगाव, एनजीओ, मिटमिटा येथील नागरिकांना चर्चेसाठी बोलाविले होते. शुक्रवारी दुपारी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. कोर्टाने सर्व स्तरांवर नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी ३ ते ४ पर्याय समोर आले आहेत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नागरिक बैठकीला होते. नागरिकांशी चर्चा करून कचरा विल्हेवाट कुठे करायची याचा निर्णय होणार आहे. कोर्टानेदेखील विभागीय प्रशासनाला यामध्ये पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन अनुषंगाने कचरा डेपो प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे शासनाने अध्यादेश काढून सूचित केले आहे.आता तरी मनपाने धडा घ्यावाआयुक्त डॉ. भापकर म्हणाले की, पालिकेने आता तरी धडा घेतला पाहिजे. कचºयाचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. ओला, सुका कचरा वेगळा करण्याची सवय नागरिकांना लागली पाहिजे. नागरिकांना डस्टबिन मिळाल्या पाहिजेत. तसेच ओला व सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था मनपाकडे असली पाहिजे. संमिश्र कचरा उचलून नेऊन टाकल्यास त्याची दुर्गंधी निर्माण होणे साहजिक आहे.
आता पुरुषोत्तम भापकर फोडणार नारेगावची कचराकोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:30 AM
महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे.
ठळक मुद्देराज्य शासनाकडून धुरा : सरकारचा महापालिकेवर भरवसा नाही; कच-यात शहराची होळी आणि धुळवड