लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात बायोमेट्रिकवर धान्य वितरणप्रणाली सुरू करण्यासाठी दुकानदारांची आता लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी दिलेले आधार कार्ड मध्यंतरी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा द्यावे लागत आहेत. मात्र आता ते दिले तरीही हे आधार कार्ड कुण्यातरी दुसºयाच दुकानदारांने वापरल्याचे समोर येत आहे. नर्सी नामदेवच्या दुकानाचे लाभार्थी चक्क बारामती जिल्ह्यातील एका दुकानावर गेले आहेत.हिंगोली जिल्हा बायोमेट्रिक व्यवहार करून धान्य वाटपात राज्यात तिसºया क्रमांकावर आहे. पुरवठा विभागाने दुकानदारांना असे व्यवहार वाढविण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर ही वाढ झाली आहे. ५0 टक्क्यांच्या आसपास बायोमेट्रिकवर आधार बेस्ड् व्यवहार होत आहेत. तर अजूनही जवळपास तेवढेच व्यवहार आधार, थम्ब इंप्रेशन, इंटरनेट नेटवर्क आदी कारणांमुळे होणे बाकी आहे. त्यात आणखी सुधारणा होण्यासाठी पुरवठा विभाग व तहसील कार्यालयांकडून दुकानदारांना तगादा लावला जात आहे. त्यामुळे दुकानदारही आता आधार कार्ड का दाखवत नाहीत, याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील ३00 ते ३५0 पैकी तब्बल ३२ लाभार्थी पुणे जिल्ह्यातील दुकानांतील लाभार्थी असल्याचे दिसून येत आहे. मूळचे नर्सीचेच असलेले व कधीही पुण्याला न गेलेल्या या लाभार्थ्यांचे आधार कार्ड तिकडे गेलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना येथे धान्य उपलब्ध करून देताना अडचणी येत आहेत.जिल्ह्यातील अनेक दुकानांची ही समस्या असण्याची शक्यता आहे. त्याची योग्य तपासणी केल्यास हा प्रकार समोर येवू शकतो. नर्सी येथील दक्षता समितीनेच याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयात दिला आहे. सरपंच वनमाला सोळंके, नंदकुमार डफळ, आयुबखॉं पठाण, बबन सावंत, भिकूलाल बाहेती आदींची यावेळी उपस्थिती होती.
आता बोला, चक्क आधार कार्डच चोरीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:25 AM