ठळक मुद्देसध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठवावी
औरंगाबाद : वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या राज्यात संचारबंदी लागू आहे. अनेक भागात एकाचवेळी मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे शहरातील अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. महावितरण मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.