शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:00 PM

यातच वर्षभरापूर्वी एकीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दुसरीवर दबाव टाकणे सुरु केले.

औरंगाबाद : प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन समलिंगी मैत्रिणींचे ब्रेकअप झाले अन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याचा प्रकार शहरात घडला आहे. ब्रेकअपनंतर एका तरुणीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दुसरीने सुरुवातीला दामिनी पथक आणि नंतर क्रांती चौक गाठले. पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेत दोघींकडून हमीपत्र लिहून  देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे.  

याबाबतच्या प्राथमिक माहिती नुसार, समीक्षा आणि दिपाली ( नावे बदललेली आहेत ) या वर्ग मैत्रिणी आहेत. समीक्षा ही काहीशी लाजरी तर दिपाली मुलांप्रमाणे बिनधास्त वागणारी आहे. त्यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. मात्र, दीपालीने चार वर्षांपूर्वी समिक्षाला माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण सोबत राहू अशी गळ घातली. यातून दोघीही सोबत राहू लागल्या. दोघीही मुलीच असल्याने पालकांना काही वेगळे वाटले नाही. दिपाली मुलांप्रमाणे समीक्षावर हक्क गाजवत असे. यातच वर्षभरापूर्वी दीपालीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दबाव टाकणे सुरु केले. समलिंगी नाते नकोसे झाल्याने आणि दीपालीच्या वागण्यास कंटाळ्याने समीक्षाने ब्रेकअपचा निर्णय घेतला. 

हा निर्णय दीपालीला पटला नाही. तिने पुन्हा लग्नाची गळ घातली, पण समीक्षा ऐकत नव्हती. यामुळे दीपालीने दोघींची काही छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची, आत्महत्येची धमकी दिली. यामुळे समीक्षा घाबरली. तिने तिने थेट दामिनी पथकाच्या प्रमुख सुषमा पवार यांना संपर्क साधला. यानंतर प्रकरण क्रांती चौक पोलिसात गेले. पोलिसांनी गांभीर्याने प्रकरण हाताळत दोघींना पालकासह ठाण्यात बोलवले. त्यांनतर पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. दोघींनी समजुतीची भूमिका घेतली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून कुटुंबासमोर हमीपत्र लिहून घेत सोडले. मात्र, चारवर्ष लिव्ह-इन रिलेशन, ब्रेकअप नंतर थेट आत्महत्येची धमकी असे ट्विस्ट असलेल्या या वेगळ्या प्रेमप्रकरणाला काय नाव द्यावे ? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादLGBTएलजीबीटी