शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

आता फक्त ‘अंत्योदय’साठीच साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:58 AM

सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक वितरणप्रणालीही हळूहळू निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. आता इतर सर्व प्रवर्ग सोडता फक्त अंत्योदय अंतर्गतच साखर वितरित होत आहे

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वसामान्यांसाठी असलेली सार्वजनिक वितरणप्रणालीही हळूहळू निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. आता इतर सर्व प्रवर्ग सोडता फक्त अंत्योदय अंतर्गतच साखर वितरित होत आहे व तीही एका शिधापत्रिकेवर फक्त एक किलो. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांची रेशनची साखर बंद करून सरकारने एका मोठ्या समूहाला नाराज करण्याची जोखीम पत्करली आहे.पूर्वी शिधापत्रिकेवरील प्रत्येकाला अर्धा किलो साखर मिळायची. आता अंत्योदय अंतर्गत शिधापत्रिकेवर कितीही सदस्य असले तरी फक्त एक किलोच साखर रेशनवर मिळणार आहे. यामागे असे कोणते अजब तर्क लावण्यात आले, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १८ हजार रु. आहे, अशी कुटुंबे अंत्योदय अंतर्गत येतात. अंत्योदयच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या सुमारे ४० हजार असेल. आता एवढ्यांनाच फक्त अर्धा किलोप्रमाणे साखर देण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांची साखर बंद केल्याने मोठीच खळबळ उडाली असून, त्यांच्यासारख्यांना साखरेची गरज असताना ती नाकारण्यात आली आहे. पूर्वी दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदयच्या शिधापत्रिकाधारकांना औरंगाबाद शहरात अडीच हजार क्विंटल साखर उपलब्ध व्हायची. आता ती फक्त अंत्योदयसाठी ४००-४५० क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात येईल.रॉके ल ४० रु. लिटर होणार....रॉकेलची सबसिडीही बंद करण्यात येणार असून, नजीकच्या काळात स्वस्त धान्य दुकानांमधून मिळणारे १८ रु. लिटरचे रॉकेल बंद होणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना रॉकेल विकता येईल, पण त्याचा भाव ४० रु. लिटर राहील. ते रॉकेल पांढरे राहील. कोणत्याही डीलरकडून आणून ते स्वस्त धान्य दुकानदारांना विकता येईल.पूर्वी स्वस्त धान्य दुकानदार गोदामात जाऊन आपले धान्य उचलत असत. आता दुकानदारांना गोदामात जाण्याची गरज राहणार नाही. कारण यासाठी ठेकेदार नेमण्यात येणार असून ते त्यांच्याशी झालेल्या करारानुसार गोदामातील धान्य उचलून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचवतील.