शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

आता औरंगाबादेतून वस्त्र उद्योग वळवला, टेक्सटाईल पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचाली

By विकास राऊत | Published: November 03, 2022 1:14 PM

केंद्रशासनाच्या थेट गुंतवणुकीवर गदा येण्याची शक्यता

- विकास राऊतऔरंगाबाद : राज्यात उद्योगांच्या पळवा - पळवीवरून रणकंदन सुरू असतानाच केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेअंतर्गत टेक्सटाईल पार्क उभारण्याच्या प्रस्तावातून औरंगाबादला वाटाण्याच्या अक्षता मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद व अमरावती या दोन विभागांपैकी एका ठिकाणी पार्क आणण्याचा प्रस्ताव होता. पार्क अमरावतीकडे नेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

उद्योगांच्या पळवा - पळवीत औरंगाबादची कायम पिछेहाट होत आली आहे. आजवर किया मोटार्सपासून इतर १३ मोठे उद्योग ऑरिकमध्ये येणार, अशी अपेक्षा असणारे अनेक उद्योग इतरत्र गेले आहेत. पीएम मित्र योजनेअंतर्गत शेंद्रा - बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कअंतर्गत ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र शासनाकडे प्रस्ताव दिला होता. एक हजार एकर जागेत स्थापन होणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे १ लाख लोकांना थेट रोजगार मिळणार होता, तर २ लाख जणांना अप्रत्यक्ष राेजगार उपलब्ध झाला असता. १३ राज्यातून या पार्कसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेले होते. त्यापैकी ७ ठिकाणांचा विचार झाला हाेता.

मराठवाड्याची कापूस निर्यात क्षमतामराठवाड्यातून सुमारे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्के कापूस निर्यात करण्याची क्षमता आहे. देशातील २७ जिल्ह्यात येथून कापूस जातो. ५०० जिनिंग प्रेसिंग उद्योग विभागात आहेत. येथे उपलब्ध असलेली जागा, दळववळण, कुशल मनुष्यबळाबाबत शासनाकडे सादरीकरण करण्यात आले होते. ४ लाख हेक्टरवरील कापूस निर्यातक्षम आहे.

यंदा १३ लाख हेक्टरवर कापूसमराठवाड्यात २०२२ - २३च्या खरीप हंगामात १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत २९ टक्के हे प्रमाण आहे. अतिवृष्टीमुळे यातील सुमारे ५० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचा अंदाज आहे. विभागातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात कापूस विकावा लागतो. यासाठी वाहतूक, मजुरीमुळे नफा - तोट्याचे गणित चुकते. त्यामुळे टेक्सटाईल पार्कची केंद्र शासनाची ४९ व राज्य शासनाची ५१ टक्के गुंतवणूक औरंगाबादेत आल्यास १३ लाख ७१ हजार ४९३ हेक्टरवरील पीक येथेच विकण्याची सोय होऊ शकते.

एआयटीएलचे एमडींचे कानावर हातऔरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊन लि.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, अमरावतीत टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याप्रकरणी काही माहिती नाही. परंतु तसा काही निर्णय झाला असेल तरी औरंगाबादला दुसऱ्या टप्प्यात पार्कसाठी गुंतवणूक येईलच. औरंगाबाद व अमरावती असे दोन प्रस्ताव होते. बजेटनुसार फेसवाईज गुंतवणुकीचे निर्णय होत असतात.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMarathwadaमराठवाडा