शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आता महापालिका देणार ९,५०० गुणांची स्वच्छ सर्वेक्षणाची परीक्षा; पण तयारी किती झाली?

By मुजीब देवणीकर | Published: April 17, 2023 12:32 PM

स्वच्छ सर्वेक्षणात दरवर्षी शहराच्या रँकिंगमध्ये घसरण होत आहे

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता सर्वेक्षणात दरवर्षी छत्रपती संभाजीनगर शहराची रँकिंगमध्ये सुधारणा होण्याऐवजी घसरण होत आहे. यंदा ९,५०० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेसाठी मनपाकडून कोणतीही खास तयारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही शहराची रँकिंग आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र शासनाने २०२२-२३ या वर्षाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी सहा महिन्यांपूर्वीच गाइडलाइनची घोषणा केली. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ७,५०० गुणांचे होते. यंदा आणखी दोन हजार गुणांची वाढ झाली आहे. यंदाचे सर्वेक्षण चार प्रकारांत केले जाणार आहे. केंद्रीय पथकाकडून नागरिकांचा फिडबॅक पहिल्या टप्प्यातच घेतला जाणार आहे. जनजागृतीबाबत मनपा प्रशासनाने कोणतीही तयारी केलेली नाही. महापालिकेने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. मात्र, येथून पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. हर्सूलचा प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. नारेगाव कचरा डेपोतील कचरा नष्ट करण्यात आलेला नाही. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा प्रश्न कायम आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने जशी साफसफाई ठेवण्यात येत होती, तशी अजिबात दिसून येत नाही. या सर्व नकारार्थी बाबी छत्रपती संभाजीनगर शहराची रँकिंग घसरण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कचरा वर्गीकरणासाठी आवश्यकनवी मुंबई, पुणे, नागपूर महापालिकांनी २०२३ च्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना, जनजागृती उपक्रम व स्पर्धा, कचरा वर्गीकरणावर नोव्हेंबर २०२२ पासूनच कार्यवाही सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेत मात्र कचरा वर्गीकरणाविषयी पूर्वीच्या तुलनेत आणखी घसरण झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी ६० टक्के वॉर्डात कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते, याचे प्रमाण आता बोटांवर मोजण्याइतक्याच वॉर्डात दिसून येते.

गतवर्षी रँकिंग ३०२०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ सर्वेक्षणाच्या रँकिंगमध्ये देशपातळीवर ३०व्या स्थानी होते. तर राज्य पातळीवर दहा शहरांत नवव्या क्रमांकावर होते. २०२१ मध्ये देशपातळीवर २२ व्या, तर राज्यात सहाव्या क्रमांकावर होते. यावेळी मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता रँकिंगमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

चार टप्प्यांत होणार सर्वेक्षण- नागरी सेवा व त्यांचा विकास : ४,५२५ गुण- स्वच्छताविषयक कागदपत्रे : २,५०० गुण- नागरिकांचा फिडबॅक : २,४७५ गुण.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका