छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जानेवारी महिन्यांत ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांची माहिती राज्य मागास आयोग संकलित करणार आहे. आयोगाने गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेत वंशावळ शोधण्यासाठी अध्यादेशातील सूचनेनुसार काम करणे, नवीन नोंदी शोधण्याबाबत आयोगाने मार्गदर्शन केले. यावेळी या व्ही.सी.ला विभागीय आयुक्त मधुकर राजेअर्दड यांच्यासह विभागातील सर्व जिल्हा प्रशासन ऑनलाईन सहभागी होते.
दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील एक हजार ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यांमधील प्रवर्गनिहाय डेटा समोर आणून आयोग त्याचे विश्लेषण करणार आहे. तसेच १९६० पूर्वीच्या नोंदी तपासण्यासाठी मोडीलिपी वाचकांची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना मोडीलिपी वाचनाचे सहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे. कुणबी जातीच्या नोंदी शोधाव्यात, अशा सूचना आयोगाने केल्या. जात प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या कामाला गती द्यावी. राज्यात ५४ लाख ,तर मराठवाड्यात जवळपास ३५ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. नोंदीच्या आकड्यांच्या तुलनेत जात प्रमाणपत्रांचे वाटप कमी आहे. ते वाढविण्याच्या सूचना व्ही.सी.मध्ये देण्यात आल्या. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या मराठा व खुल्या प्रवर्गाच्या पाहणीत छत्रपती संभाजीनगर मागे आहे. या जिल्ह्यासह विभागात नोंदी शोधाव्यात, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक संस्थांमधील डेटा घेणारउच्चशिक्षणात कोणत्या प्रवर्गाचे किती विद्यार्थी आहेत, याची माहिती संकलित करण्याचा विचार मागासवर्ग आयोगाने केला आहे. सेकंडरी डेटा हाताशी असावा म्हणून आयोगाने माहिती घेण्याचे ठरविले आहे, असे विभागीय प्रशासन सूत्रांनी सांगितले.
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्याजिल्हा ............आत्महत्याछ. संभाजीनगर ...९जालना.... १९ परभणी ....० हिंगोली.... २ नांदेड ....१४ बीड .....१८ लातूर .....५ धाराशिव.... १५....................एकूण ८२