शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आता काय नुसते खाद्यतेल प्यायचे का ! खाद्यतेलाची फोडणी स्वस्त; डाळी महाग

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 08, 2023 7:48 PM

डाळींनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. परिणामी तूर डाळीपासून ते मसूर डाळीपर्यंत सर्वांचे भाव किलोामागे २ ते १० रुपयांपर्यंत वाढले.

छत्रपती संभाजीनगर : मागील दोन वर्षांत पहिल्यांदा करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले. अन् तीन महिन्यांत अन्य खाद्येतलांचे भाव २५ रुपयांपर्यंत घटले. पण याच वेळी डाळींचे भाव मात्र वधारले आहेत. आता काय नुसते खाद्यतेलच प्यायचे का, असा सवाल ग्राहक विचारत आहेत.

मागील दोन वर्षे करडीचे उत्पादन कमालीचे घटले होते. यामुळे एरवी १०० ते १२० रुपये लिटर दरम्यान विक्री होणारे करडी तेल चक्क २२५ रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले होते. करडी तेल आरोग्यासाठी लाभदायक असल्याने ग्राहकांना ते खरेदी करावेच लागले. दरवर्षी वसंतपंचमीपासून करडीची आवक होते मात्र यंदा महिनाभर उशिरा आवक सुरू झाली. आता करडी बी ची आवक हळूहळू बाजारात वाढत आहे. महाराष्ट्रा शिवाय कर्नाटक व आंध्र प्रदेशातून करडी बी आणली जाते. आधी ५४०० रुपये क्विंटल करडी बी विकत ते आजघडीला ४६०० रुपयांपर्यंत येऊन ठेपले आहे. परिणामी किरकोळ विक्रीत करडी तेल लिटरमागे १० रुपयांनी कमी होऊन २१० ते २१५ रुपये विकत आहे. परिणामी मागील आठवड्यात सर्व तेलांचे भाव लिटरमागे ५ रुपयांनी कमी झाले. मागील वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल, पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. यामुळे सूर्यफूल तेल १९० रुपयांपर्यंत गेले होते. हा आजपर्यंतचा भावाढीचा विक्रम ठरला होता. पण आता खाद्यतेलाची आयात सुरळीत असल्याने गेल्या तीन महिन्यांत ५० रुपये भाव लिटरमागे कमी झाले. अन्य खाद्यतेलांचे भावही २० ते २५ रुपयांनी घटले.

डाळीच्या दरात वाढ का?मागील वर्षी हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली होती. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट झाली. अन्य डाळींनाही अवकाळी पावसाचा फटका बसला. परिणामी तूर डाळीपासून ते मसूर डाळीपर्यंत सर्वांचे भाव किलोामागे २ ते १० रुपयांपर्यंत वाढले. नवीन मुगाची चाहूल लागली असून जर पाऊस पडला नाही तर मुगाचे उत्पादन चांगले होईल, असे व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.

करडी तेलाचे भाव आणखी घटतीलमहाराष्ट्रात करडी बीची आवक उशिरा का होईना सुरुवात झाली. आता कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आवक वाढली की करडी तेलाचे भाव आणखी लिटरमागे १० रुपये कमी होतील.- जगन्नाथ बसैये, खाद्यतेल व्यापारी

भाव उतरणे अपेक्षीत होतेखाद्यतेलाचे भाव कमी झाले पण डाळींचे भाव वाढले आहेत. डाळींचे भाव कमी झाले असते तर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असता. पण ठीक आहे. खाद्यतेलाचे भावही खूप वाढले होते.- सायली जोशी, गृहिणी

खाद्यतेलाच्या किमतीतील फरक (प्रतिलिटर)प्रकार ३१ मार्च ७ एप्रिलकरडी तेल २२५ रु. २१५शेंगदाणा तेल १८५ रु. १८० रुसूर्यफूल तेल १४५ रु. १४० रुसोयाबीन तेल १२० रु. ११५ रुसरकी तेल १२५ रु. १२० रुपाम तेल ११० रु. १०५ रुतीळ तेल २०५ रु. २०० रु

डाळीतील किमतीतील फरक (प्रतिकिलो)प्रकार ३१ मार्च ७ एप्रिलतूर डाळ ११० रु. १२०रुहरभरा डाळ ६४ रु. ६८ रुमूग डाळ १०० रु. ११२ रुउडीद डाळ ९४ रु. १०२ रुमसूर डाळ ९० रु. ९२ रु

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबाद