संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील वेरूळ लेणी हे हायड्रोलिक लिफ्ट असलेले देशातील पहिले स्मारक बनणार आहे, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठांनाही वेरूळ लेणीचे सौंदर्य विनात्रास न्याहाळता येणार आहे.
येथील ३४ लेण्यांपैकी कैलास लेणी म्हणून प्रसिद्ध असलेली गुहा क्रमांक १६ येथे दुमजली रचना आहे. आणि पर्यटकांना वरच्या भागातून दृश्याचा आनंद घेण्यासाठी पायऱ्या चढून किंवा उतारावर जावे लागते. गुहेत एक जिना आणि व्हीलचेअरच्या सुरळीत हालचाल करण्यासाठी एक रॅम्प आहे, एएसआयने संरचनेच्या दोन्ही बाजूंने लहान लिफ्ट् बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
लिफ्ट्स बसवण्यासाठी कोणतेही बांधकाम होणार नाही. ९ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ असलेली यंत्रणा लहान असेल. ज्यामध्ये व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती पहिल्या मजल्यावर सहज जाऊ शकते, असे अधिकारी म्हणाले.