चंद्रमुनी बलखंडे, परभणीदिवसेंदिवस वाढत जाणारा तणाव कमी करण्यासाठी व असाध्य रोगांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या मॉर्निंग वॉक्साठी दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून, विद्यापीठ परिसरात पहाटेपासूनच फुलत आहे़ हिवाळ्याची चाहूल लागताच शरीर संपत्ती कमावण्याच्या संधीचा फायदा अनेक नागरिकांसह युवकही सोडत नाहीत़ मागील काही वर्षांपासून सततच्या कामाच्या व्यापातून स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही़ त्यामुळे शरिरामध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहेत़ बैठे काम, अवेळी जेवण त्यामुळे तणावग्रस्त जीवन बनत चालले आहे़ दिवसभरातही वाहनांच्या गोंगाटाने ध्वनी प्रदूषण, उखडलेल्या रस्त्यामुळे माखलेले धुळीचे साम्राज्य आणखीच भर टाकत आहेत़ याचा परिणाम जीवनशैलीवर पडत आहे व अनेक व्याधींना निमंत्रण मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे़ वाढलेले आजार कमी करण्यासाठी व आजारच उद््भवणार नाहीत, यासाठी नागरिकही आता जागरूक झाले आहेत़ सध्या हिवाळा असूनही शहरात थंडीचा परिणाम जाणवत नाही़ सकाळची शुद्ध हवा (आॅक्सीजन) मिळत असल्याने नागरिक सकाळीच घराबाहेर मॉर्निंग वॉक्साठी बाहेर पडत आहेत़ मॉर्निंग वॉक्मुळे शरीर संतुलन वाढत जाते़ सकारात्मक विचारसरणी निर्माण होते़ रक्ताभिसरण वाढते व काम करण्याची उर्जा मिळते़ दिवसभर निर्माण होणारा थकवा जावून उत्साह वाढीस लागतो़ मन प्रसन्न होत असल्याने हृदय चांगले कार्य करते. (समाप्त)
मॉनिंग वॉक्साठी वाढली नागरिकांची संख्या
By admin | Published: November 15, 2014 11:45 PM