औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ३१ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५८ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ४६ हजार ५२८ रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ४५ हजार ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३१ रुग्णांत मनपा हद्दीतील २७, ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५१ आणि ग्रामीण भागातील ७, अशा एकूण ५८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात ६४ वर्षीय पुरुष आणि परभणी जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
हर्सूल २, अयोध्यानगर १, गजानन मंदिर १, शहानूरवाडी २, उत्तरानगरी १, पुंडलिकनगर १, एन-सात, सिडको १, जटवाडा रोड १, एन-सहा, साईनगर २, एन-पाच, सिडको १, अरिहंतनगर १, सातारा परिसर १, अन्य १२.
ग्रामीण भागातील रुग्ण
कन्नड १, अन्य ३.