शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नंबर, औरंगाबादेत दरवर्षी १० हजार नागरिकांचा मृत्यू! 

By मुजीब देवणीकर | Updated: February 20, 2023 15:58 IST

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शेडसह वाढवा ही मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : शहरात दरवर्षी जवळपास दहा हजार नागरिकांचा मृत्यू होतो. कोरोनाकाळात म्हणजेच २०२१ मध्ये मृत्यूने विक्रमच केला. तब्बल १२ हजारांहून अधिक नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिका दप्तरी आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. तेव्हापासून आजपर्यंत काही स्मशानभूमींमध्ये नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागते.

ऐतिहासिक औरंगाबाद शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. हर्सूल, पडेगाव, पैठण रोड, सातारा-देवळाई, चिकलठाणा, जटवाडा रोड आदी भागात नागरी वसाहतींचा विस्तार होत आहे. रोजगारासाठी ग्रामीण भागातील बेरोजगार मोठ्या संख्येने दररोज दाखल होतात. एकीकडे लोकसंख्या वाढत असताना स्मशानभूमी, कब्रस्तानची संख्या आहे तेवढीच आहे. शहरात ४२ स्मशानभूमी, तर ४२ कब्रस्तान आहेत. सातारा-देवळाई भागात दोन स्मशानभूमी आहेत, मात्र, तेथे पुरेशा सोयीसुविधा नाहीत, म्हणून अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी प्रतापनगर स्मशानभूमी गाठतात. नारेगाव भागात कब्रस्तान नाही, म्हणून एका संघटनेने ‘जनाजा मोर्चा’चे आयोजन केले. प्रशासनाने आश्वासन देऊन मोर्चा थांबविला. पडेगाव भागातही कब्रस्तानचा प्रश्न भेडसावतोय. कैलासनगर, मुकुंदवाडी, एन-६, प्रतापनगर, पुष्पनगरी, एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागतात. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शेडसह वाढवा ही मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

अनेकदा पाठपुरावा केलामुकुंदवाडी स्मशानभूमीत अनेकदा अंत्यसंस्कारासाठी रांगा लागतात. या ठिकाणी अंत्यसंस्काराचे शेड वाढवावेत अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, त्यांची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही.- भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक

स्मार्ट सिटीची योजना बारगळलीस्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील ९ अत्यंत महत्त्वाच्या स्मशानभूमी अद्ययावत करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला होता. स्मार्ट सिटी संचालक बोर्डाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर ही योजना गुंडाळण्यात आली.

मृत्यूच्या आकडेवारीतील चढउतारवर्षे- पुरुष- महिला-एकूण२०१८-५७८८-३८५२-९६४०२०१९-५४२८-३६७२-९१००२०२०-४३७५-२४८१-६८५६२०२१-८०९५-४८६०-१२९५५२०२२-५५०२-३२२५-८७२७

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका