शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

होम आयसोलेशनची संख्या वाढतेय; रुग्णालयात जागा नाही, २५०० रुग्णांवर घरीच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 6:50 PM

The number of home isolations is increasing in Aurangabad शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रुग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत.

ठळक मुद्दे१० शिक्षकांची टीम दररोज घेणार रुग्णांची माहिती

औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चाैकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १० शिक्षकांची टीम कामाला लावली आहे. महापालिकेच्या कोविड वॉरमध्ये ही टीम कार्यरत असून, दररोज होम आयसोलेशनमधील रुग्णांशी फोनवर संपर्क केला जात आहे. एका रुग्णाच्या आरोग्याची सतत १० दिवस या टीमकडून माहिती घेतली जाणार आहे.

शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रुग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या आणि अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये घरीच उपचार दिले जात आहेत. यासाठी रुग्णाच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा तो राहत असलेल्या संबंधित परिसरातील त्यांच्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र रुग्णाला पालिकेकडे सादर करावे लागते. त्यानंतर संबंधित डॉक्टरकडूनच या रुग्णांना आवश्यक औषधे व उपचार दिले जातात, तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे का, याविषयी रोजची विचारपूस पालिकेच्या यंत्रणेकडून केली जाते. 

पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी पालिकेच्या कोविड वॉररूममध्ये १० शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. या दहा शिक्षकांच्या टीमकडे होम आयसोलेशन रुग्णांचा मोबाइल क्रमांकासह डाटा दिलेला आहे. त्यानुसार रोज संबंधित रुग्णांशी संपर्क करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. यात काही रुग्णांत गंभीर लक्षणे जाणवल्यास पालिकेचे पथक त्यांच्या घरी जाते. आवश्यकता भासल्यानंतरच संबंधित रुग्णास कोविड सेंटरमध्ये दाखल केेले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

होम आयसोलेशनचाही वाढतोय आकडादिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांचाही आकडा वाढत चालला आहे. रविवारच्या प्राप्‍त अहवालानुसार, शहरात तब्बल २,५०० रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद