औरंगाबाद : जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या १३ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक अलगीकरणाचे प्रमाण सध्या शून्यावर आहे.
विभागात ११ हजार नागरिक क्वारंटाईन
औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या ११ हजार नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत. यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबादमध्ये शून्य आकडा आहे, तर परभणी ९१६३, हिंगोली १ हजार, नांदेड १२५, लातूरमध्ये १९८, तर जालन्यात ८७ नागरिक इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
कन्टेन्मेंट झोनची संख्या वाढली
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले कन्टेन्मेंट झोन ४२१ वरून ४४९ आणि आता ४९६ झाले आहेत. यात परभणीत ६३, हिंगोलीत १३, नांदेडला ४१, बीडमध्ये ५, लातूरमध्ये ३०७, तर उस्मानाबादमध्ये ६०, जालन्यात ७ कन्टेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये एकही कन्टेन्मेंट झोन केलेला नाही.