साहेबराव हिवराळे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात पशुधनाची संख्या रोडावली असून, पावणेसात लाखांपर्यंत लहान-मोठी जनावरे आणि बकºया, मेंढ्यांसह ११ लाखांपर्यंतचा आकडा आहे. सततच्या दुष्काळात वैरणीअभावी देशी गायींची संख्या २० टक्क्यांपेक्षा अधिक रोडावल्याचे चित्र आहे.विदर्भात गवळावू, मराठवाड्यातील देवणी, लालकंधारी, धारपारकर, खिलार, गुजरातची ओखल्या आदी जाती आहेत; परंतु संकरित गायीचा प्रकार कालबाह्य झाला आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार सात ते पावणेसात लाखांवर लहान-मोठी जनावरे आहेत. बकºयांची संख्या ३ लाख असून, जिल्ह्यात एक लाखापर्यंत मेंढ्यांची संख्या आहे.येथील देशी गायी सध्या प्रगतशील इस्रायलमध्ये आढळून येत आहेत. त्यांनी ते वाण जपलेले आहे. त्या दुग्धव्यवसायासाठी उत्तम ठरलेल्या आहेत. सततचा दुष्काळ आणि जनावरांच्या चारा-पाण्याची दयनीय अवस्था पाहता, शेतकरीही पशुधनाचा सांभाळ करण्यास हतबल झाला आहे. यंदा पावसाळा बºयापैकी असला तरी पशुधनात वाढ झाली की घट, याचा आकडा शासन दरबारी आॅनलाइन उमटणार आहे. महाराष्ट्रभर ही संख्या नोंदणी केली जाणार असून, आॅक्टोबर महिन्यात होणारी पशुगणना काही तांत्रिक बाबींमुळे विलंबाने सुरू होणार आहे. पशुधनदेखील आॅनलाइन जोडण्याची पंचवार्षिक योजनेत शासनाची तयारी विलंबाने होत आहे. त्यादृष्टीने सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाभर शेतकºयांच्या बांधावर व गोठ्यात प्रगणक कागदापेक्षा आॅनलाइन सरळ नोंदी करण्यासाठी टॅब्लेटचा वापर करणार आहेत. जिल्ह्यात २५० च्यावर प्रगणकांच्या समावेशाची शक्यता आहे.संकरित जनावरे झाली हद्दपारमराठवाड्यात संकरित जनावरांनी भर घातली होती; परंतु सध्या ते कालबाह्य झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पशूंना सांभाळणाºया गोपालकाची परिस्थितीदेखील खालावल्याने वैरणपाण्याचा यक्षप्रश्न भेडसावत आहे. जनावरे दावणीला उपाशीपोटी राहिल्यास पशुपालकाचे मन तीळतीळ तुटते. पशुपालकांनी चारा-पाण्याची व्यवस्था करून दुग्धव्यवसाय भरभराटीस आणल्याची काही अपवादात्मक उदाहरणे आहेत. पशुसंवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न व्हावेत, असे मत सेवानिवृत्त पशुसंवर्धक अधिकारी डॉ. अरविंद मुळे यांनी मांडले.गणनेनंतरच सत्य कळेलजिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डी.एस. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, देशी जनावरांची संख्या रोडावली आहे. आॅनलाइन पशुगणनेसाठी टॅब्लेटचा वापर प्रगणक करणार आहेत. तेव्हा सत्य आकडेवारी सांगता येणार आहे.
देशी गायींची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:43 PM