औरंगाबाद : शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार कुठे करावेत? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. युद्धपातळीवर २१ कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील नऊ केंद्र सुरूही झाले. आज सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाऊसफुल्ल होत आहे. दररोज एक नवीन केंद्र उघडण्याची लगबग महापालिकेला करावी लागत आहे.
१ मार्चपासून महापालिकेने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या. दररोज चार ते पाच हजार तपासण्या करण्यात येत आहेत. महापालिकेच्या काही तपासणी केंद्रांवर नागरिकांनी लांबलचक रांगाही लावलेल्या आहेत. किरकोळ ताप असला तरी नागरिक तपासणीसाठी धाव घेत आहेत. १०० नागरिकांची तपासणी केली, तर किमान २५ ते ३० पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थिक परिस्थिती उत्तम असलेले नागरिक थेट खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. काही नागरिक महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर अवलंबून आहेत. महापालिका त्यांना जेवण आणि मोफत उपचारही देत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणून विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन, कडक निर्बंध प्रशासनाकडून लादणे सुरू केले आहे. यानंतरही कोरोनाची साखळी ब्रेक व्हायला तयार नाही. एकाच कुटुंबातील किमान तीन ते चार नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. दररोज पॉझिटिव्ह येणार्या नागरिकांपैकी ६० टक्के नागरिक महापालिकेच्या सीसीसीमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने युद्धपातळीवर कंत्राटी कर्मचारी भरती महापालिकेने सुरू केली आहे.
सध्या सुरू असलेल्या सीसीसी सेंटरचा तपशील : सीसीसी सेंटर-क्षमता-सध्या रुग्णमेल्ट्रोन हॉस्पिटल-३००-२७१एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स-८८-६८एमआयटी बॉइज् होस्टेल-२७० -२८१किलेअर्क होस्टेल - ३०० - २७२ईओसी पदमपुरा - ६२ -६१सीएसएमएसएस महाविद्यालय - ८३-८५सिपेट - २७७ - ६६शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय - २५४-२५१शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय - १८० -१५६पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय - १२५ - सुरू
नवीन सीसीसीचे नियोजन : केंद्राचे नाव - रुग्ण क्षमतादेवगिरी बॉइज् होस्टेल-२५०पदमपुरा गर्ल्स हॉस्टेल-८०विभागीय क्रीडा संकुल-४००आयआयएचएम बॉइज होस्टेल-१२९विद्यापीठातील साई संस्था-२७०विद्यापीठातील बॉइज् होस्टेल-९३विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेल-९८यशवंत गर्ल्स हॉस्टेल-१०८नवखंडा महाविद्यालय-९३जामा मशीद-१०५कलाग्राम-७५