शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 5:39 PM

Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादहून २४ रेल्वेंची ये-जा  रेल्वेस्टेशन पुन्हा गजबजलेकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रवासावर भर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : लाॅकडाऊनमुळे कधी नव्हे इतकी शांतता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Aurangabad Railway Station ) अनुभवास आली. मात्र, अनलाॅक होताच एक-एक रेल्वे सुरू होत गेली. आजघडीला औरंगाबादहून दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २४ रेल्वेंची ये-जा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, मुंबई मार्गावर सध्या सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. ( The number of trains increased in Aurangabad) 

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आल्याने देशभरातील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमार्गे धावणाऱ्या २४ पैकी ११ रेल्वे या रोज धावतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही ( Railway Passenger ) वाढली आहे. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्म पुन्हा एकदा प्रवाशांनी भरलेले पाहायला मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीही वाढली आहे.

या रेल्वेंना प्रवाशांची गर्दीऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या सर्वाधिक गर्दी ही मुंबईच्या रेल्वेंना होत आहे. तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सचखंड एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सध्या कोरोना चाचणी केली जाते.

रोज ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीकोरोना प्रादुर्भावामुळे काही कालावधीत प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली असून, दररोज ३०० तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्स अशक्यरेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्स पाळणे प्रवाशांना अशक्य होत आहे. रेल्वे आल्यावर बोगीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. कोरोना प्रादुर्भावाची पर्वा न करता अनेक जण मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

तोंड धुण्यासाठी मास्क काढलापरभणीवरून औरंगाबादपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. रेल्वेतून उतरल्यानंतर तोंड धुण्यासाठी मास्क काढला. लगेच मास्क लावला.- विशाल भंडारे, प्रवासी

रेल्वे प्रवासात मास्क मिळावाघाईगडबडीत मास्क कुठेतरी पडला. प्रवासात मास्क मिळण्याची कुठेही सुविधा दिसून आली नाही. प्रवासात मास्क मिळाला पाहिजे.- एक प्रवासी

सध्या सुरू असलेल्या रेल्वे :- सचखंड एक्स्प्रेस- नंदीग्राम एक्स्प्रेस- देवगिरी एक्स्प्रेस- जनशताब्दी एक्स्प्रेस- तपोवन एक्स्प्रेस- अजंता एक्स्प्रेस- रेणीगुंठा एक्स्प्रेस- मराठवाडा एक्स्प्रेस-नांदेड-राेटेगाव डेमू- औरंगाबाद-हैदराबाद विशेष रेल्वे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनMumbaiमुंबईRailway Passengerरेल्वे प्रवासी