शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

सरकार ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:56 AM

ओबीसी-भटक्या विमुक्तांनी ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : या देशातील ५२ टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसींच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, यासंबंधीचा जाब विचारण्यासाठी आता ओबीसी-भटक्या विमुक्तांनी ‘जवाब दो’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.रविवारी दुपारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात शहरातील ओबीसी व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी मनोज घोडके हे होते.राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद न्या. म्हसे यांच्या निधनामुळे रिक्त झाले आहे. ओबीसींसाठी असलेल्या या आयोगाच्या अध्यक्षपदावर आता तरी शासनाने ओबीसी तज्ज्ञाची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच एससी, एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही केवळ ६५० नव्हे तर १३०० अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जावी, यावर भर देण्यात आला. ओबीसींसाठी असलेले ओबीसी आर्थिक विकास महामंडळ केवळ कागदावर आहे. या महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, या मागणीसाठी लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे आंदोलन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत करण्यात आला. समता परिषदेचे रमाकांत तिडके, विलास ढंगारे, महाराष्टÑ राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीच्या अध्यक्षा सरस्वती हरकळ, उपाध्यक्षा संजीवनी घोडके, अ‍ॅड. महादेव आंधळे, कै काडी समाजाचे नेते संजय मेढे, भटक्या- विमुक्तांचे नेते अमिनभाई जामगावकर, पंडितराव तुपे, विष्णू वखरे, सुतार समाजाचे सुरेश आगलावे, अनिता देवतकर, रमेश गायकवाड, दीपक राऊत, नितीन तोगे, गोविंद पांचाळ, सय्यद हबीब, सोमनाथ चोपडे, बिपीन होले, दत्तात्रय आरसुळे, संजय माळी आदींनी आपापली मते मांडली.ओबीसींच्या आंदोलनात विद्यार्थी व युवकांचा सहभाग वाढविण्याचे व एससी, एसटी, भटक्या- विमुक्तांचाही सहभाग घेण्याचे आज ठरविण्यात आले. बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येचा व पुण्यासारख्या शहरात सोवळ्यावरून जातीय दरी रुंदावण्याच्या ज्या हीन मानिसकतेचे दर्शन घडविण्यात आले, त्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला. गौरी लंकेश यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संदीप घोडके यांनी आभार मानले.