रा जूर : जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या प्राथमिक पदवीधर पद परावर्तन प्रक्रियेत काही अपात्र शिक्षकांची निवड झाल्याची तक्रार एका शिक्षकाने केली आहे.दरम्यान, पात्र असलेल्या कनिष्ठ शिक्षकांवर प्रशासनाच्या निर्णयाने अन्याय झाला असून तो दुरूस्त करून पात्र शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक डी.के.जगताप यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.नुकतीच जिल्हापरिषदेने पद परावर्तन प्रक्रिया केली. यामधे ज्येष्ठता यादीत जिल्हा बदलीने परजिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची रूजू झाले ती तारीख ग्राह्य न धरता प्रथम सेवेची नेमणूक ग्राह्य धरून प्राथमिक पदवीधर म्हणून नेमणूक करण्यात आली. यामुळे अनेक शिक्षकांची ज्येष्ठता डावल्या गेली. यातील काही शिक्षकांनी पद परावर्तन सुध्दा करून घेतले. प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. अांतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रथम नेमणुक २००१ व २००२ दाखविण्यात आली आहे. वास्ताविक सन २००१ व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २००२ मध्ये जालना जिल्हापरिषदेत त्यावेळी कोणतीही शिक्षक भरती झालेली नाही. भरती थेट आॅक्टोबर-नोव्हेंबर २००२ मध्ये झालेली आहे. असे असतानाही पद परावर्तन मध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक, डी.एड सुरु असतांना पूर्णवेळ बी.ए.केलेले शिक्षक व सेवेत असतांना नियमीत बी.ए.केलेले शिक्षक यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सेवापुस्तिकेवरून व मुळ कागदपत्रांची पडताळणी करून जिल्हा परिषद प्रशासनाने संबधितांना नेमणुका द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर डी.के.जगताप, व्हि. ए. सपकाळ, बी.ए.सपकाळ, बी. एस. जंजाळ, आर.व्हि.निहाळ, बी.के. घुगे आदींच्या सहया आहेत. (वार्ताहर)
अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीवर आक्षेप
By admin | Published: August 03, 2014 12:45 AM