शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

चौपदरीकरणात अडथळ्यांचे डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:39 AM

औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ ला जोडणाºया मार्गाच्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण येत असल्याचे डीपीआरमध्ये समोर आले आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ ला जोडणाºया मार्गाच्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण येत असल्याचे डीपीआरमध्ये समोर आले आहे. बिडकीन परिसरात १९ कि़ मी. च्या अंतरात अडथळ्यांवर मात करून या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी २५० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे.केंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे डीपीआरचे काम सुरू असून, भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता. परंतु नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआरचे काम सुरू झाले आहे.एनएचआयएच्या सूत्रांनी सांगितले की, डीपीआरचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. घरांची तोडफोड करावी लागेल. १९ कि़ मी. पर्यंत ही परिस्थिती आहे. मनपाची जलवाहिनीदेखील त्याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च २५० कोटींच्या आसपास जाईल. उड्डाणपूल करण्याचा पर्याय आहे. परंतु त्याचा खर्च वाढेल. बिडकीनपासून पुढे अडचण नाही. शेवगाव ते तीसगावपर्यंत मार्ग होईल. एनएन-२२२ ला हा मार्ग जोडण्याचा प्रयत्न आहे.वाहतूक मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होईल. औरंगाबाद ते पैठण ६० कि़मी., पैठण ते शेवगाव ३० कि़ मी., २० कि़ मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़ मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. १४० कि़ मी. पर्यंत या मार्गासाठी १ हजार कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे.