छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोबर महिना मंगळवारपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी उन्हाचा तडाखा जाणवला. ऑक्टोबर हिटची चाहूल या निमित्ताने लागली. दिवसभर कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अर्ध्या शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर रेल्वे स्टेशन व इतर परिसरात ऊन होते. ऑक्टोबर हिट, ऊन-सावल्या आणि पाऊस असे संमिश्र वातावरण मंगळवारी शहरवासीयांनी अनुभवले. कमाल तापमान २२.८ अंश सेल्सिअस होते. ४.२ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली.
गेल्या बुधवारपासून एकेक अंशाने तापमान वाढू लागले. बुधवारी कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस होते, तर १.५ मि.मी. पाऊस झाला. त्यादिवशी रात्री उशिरापर्यात ३६.८ मि.मी. पाऊस बरसला. तरी वातावरणातील उष्मा कायम होता. मागील गुरुवारी कमाल तापमान २९.६ अंश सेल्सिअस होते. २८ सप्टेंबर रोजी कमाल तापमान २९.८ अंश सेल्सिअस, २९ सप्टेंबर रोजी कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस, तर ३० सप्टेंबर रोजी कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी कमाल तापमान एक अंशाने वाढले.
विजांसह पाऊस होणारऑक्टोबर हिटला सुुरुवात झाली आहे, असेच म्हणावे लागेल. दिवसा ऊन आणि सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी, असे वातावरण पुढील दोन ते चार दिवस राहील. या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. परतीचा मान्सून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या पुढे सरकला आहे.- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ.