(अपेक्षित ५ स्टार)
औरंगाबाद : पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करणारा किशोर कैलास बैनाडे (रा. बेंदेवाडी, ता. औरंगाबाद)
याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी ६ महिन्यांचा कारावास आणि ४ हजार रुपये दंड सुनावला. दंडाच्या रकमेपैकी ३ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.
काय होता खटला?
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ११ जून २०१६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ती घरापासून काही अंतरावर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी किशोर कैलास बैनाडे याने तिचे तोंड दाबून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिला धमकावले. महिलेचा पती व सासरा धावत आले. त्यांनाही शिवीगाळ करत किशोर पळून गेला होता. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने यापीर्वीही फिर्यादीचा विनयभंग केला होता.
खटल्याच्या सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी किशोर बैनाडे याला ‘विनयभंगाच्या’ आरोपाखाली भादंवि ३५४ (अ) नुसार वरीलप्रमाणे शिक्षा, दंड आणि नुकसानभरपाईचा आदेश दिला. सहायक सरकारी वकील आमेर काझी यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस.बी. पठाण यांनी काम पाहिले.