शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:50 PM

शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

औरंगाबाद : शिक्षक तरुणावर प्रेम असल्याचे भासवून नंतर लग्नास नकार देत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एका तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला.रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टी, असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर विजय अंबादास हिवाळे, असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, विजय आणि रोशनी हे २०१२ पासून मुकुंदवाडीतील एका खाजगी शाळेत सहशिक्षक म्हणून एकत्र काम करायचे. या कालावधीत त्यांच्यात सुरुवातीस मैत्री आणि नंतर प्रेम झाले. रोशनीवरच्या प्रेमापोटी विजयने एका खाजगी बँकेतून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन ती रक्कम तिला दिली. शिवाय मिळालेल्या वेतनाची सर्व रक्कम तो तिच्यासाठी खर्च करीत असे. मात्र, सहा महिन्यांपासून तिने विजयला भेटणे बंद केले होते. तेव्हापासून विजयला नैराश्य आले होते. अचानक नैराश्यात गेलेल्या विजयला त्याचा भाऊ अभिजित यांनी विचारणा केली असता रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टी हिच्यावर त्याने जिवापाड प्रेम केले. तिला पैसेही दिले. मात्र, ती पैसे घेईपर्यंत गोड बोलते आणि नंतर भेटत नाही. तिने पैशासाठी प्रेमाचे नाटक केल्याने मला मानसिक धक्का बसल्याचे त्याने अभिजितला सांगितले होते. दरम्यान, १ जून रोजी विजयने आदर्श कॉलनीतील घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी विजयचा भाऊ अभिजित यांनी शनिवारी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून रोशनी ऊर्फ लक्ष्मी शेट्टीविरोधात गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी