नांदेड : इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यासाठी सहा हजार रुपये लाच घेणाऱ्या गुलजार एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मो़ हिस्सामोद्दीन मो़ मस्लीहोद्दीन व लिपिका अमिना सुलताना या दोघांना अटक करण्यात आली़ देगलूरनाका भागातील मदिनानगर येथे ईकरा उर्दू प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये एका मुलीस प्रवेश घेण्यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष मो़ हिस्सामोद्दीन हे सहा हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार २१ जून रोजी करण्यात आली होती़ त्या तक्रारीनुसार आज २३ जून रोजी तक्रारदाराकडून मो़ हिस्सामोद्दीन यांच्यासाठी सहा हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या शाळेच्या लिपिका अमिना सुलताना यांना पकडण्यात आले़ ही कारवाई पोलिस अधीक्षक एऩ व्ही़ देशमुख, उपअधीक्षक एम़ जी़ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ दरम्यान, जिल्ह्यात सध्या शाळा, महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत़ शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्था चालक लाच मागत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे़ (प्रतिनिधी)
प्रवेशासाठी लाच घेणाऱ्यांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: June 24, 2014 12:38 AM