शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा

By बापू सोळुंके | Published: August 04, 2024 6:14 PM

मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदवली.

बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी फेसबुक या समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात शनिवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने याविषयी तक्रार नोंदवली. प्रशांत रामकृष्ण येनगे (रा. कामगार चौक, सिडको)असे गुन्हा नोंद झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी भरत कदम यांनी याविषयी मुकुंदवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, ३० जुलै रोजी रात्री ते फेसबुकवर त्यांचे अकाऊंट पहात असताना त्यांच्या ओळखीचे प्रशांत येनगे यांने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर टाकलेली पोस्ट वाचली. यात नमूद होते की, माध्यमांनीही साथ सोडली, जरांगेच्या निशाण्यांवर फक्त भाजप, देवेंद्र फडणवीस यांचेवर अतिशय खालच्या पातळीवर टीका, असा मजकुर व त्यामध्ये जरांगे यांचा फोटो व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो खाली तुतारीकडून सुपारी घेऊन महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरणाऱ्या जरांगेला नियती धडा शिकवणार'असा मजकुर लिहिलेला होता.

मराठा समाज आणि अन्य समाजामध्ये द्वेष व शत्रूत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने येनगे यांनी ही पोस्ट टाकल्याचे कदम यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी येनगेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२) आणि भारतीय न्याय संहिता कलम ३५३(१)(सी) नुसार गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबाद