शिरूर कासार : येथील पंचायत समितीमधील लेखा विभागातील कर्मचाऱ्यासह गटविकास अधिकारी व्ही. एन. घोडके यांना सोमवारी कार्यालयातच बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून, हल्लेखोर पसार आहेत.शिरूर पंचायत समिती अंतर्गत बैठक घेण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची चर्चा या हल्ल्यानंतर शहरात सुरू होती. पंचायत समितीमध्ये लेखा विभागात कार्यरत प्रल्हाद मिरगे हे दुपारी दोन वाजता कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये जेवण करीत होते. इतक्यात एक अनोळखी तरूण तेथे आला. त्याने मिरगे कोण आहे ? असे विचारले. मीच मिरगे आहे, असे मिरगेंनी सांगितले तेव्हा या तरूणाने हातातील ऊसाच्या टिपऱ्याने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर नागरिकांनी हल्लेखोराच्या तावडीतून मिरगेंना सोडविले. नंतर मिरगे शिरूर ठाण्यात गेले व त्यांनी अज्ञात आरोपीविरूद्ध तक्रार दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. या गर्दीत घुसलेल्या काही हल्लेखोरांनी गट विकास अधिकारी व्ही. एन. घोडके यांना टार्गेट केले. मिरगे यांच्यापाठोपाठ घोडके यांच्यावरही हात उगारला. (वार्ताहर)अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी यांनी शिरूरमध्ये भेट दिली. रायमोहा प्रा. आ. केंद्रात घोडके, मिरगेंवर उपचार केले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचेही जवाब नोंदविले.
अधिकाऱ्यांची भेट बीडीओस मारहाण
By admin | Published: February 17, 2015 12:05 AM