शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

प्रतिनियुक्तीवर शासनाकडून अधिकारी मागविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:06 AM

औरंगाबाद : महापालिकेतील उच्च पदांवर काम करणारे अधिकारी पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये निवृत्त होत आहेत. पदोन्नतीने ही पदे ...

औरंगाबाद : महापालिकेतील उच्च पदांवर काम करणारे अधिकारी पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये निवृत्त होत आहेत. पदोन्नतीने ही पदे भरण्यासाठी महापालिकेचे अधिकारी नाहीत. महापालिकेचे कामकाज चालविण्यासाठी भविष्यात अधिकारीच राहणार नाहीत. त्यामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी सांगितले.

महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे पाच महिन्यांनंतर निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी अनुभवी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे एक महिना अगोदर निवृत्त होत आहेत. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. याशिवाय यांत्रिकी विभागातील बाबूराव घुले यांच्यासह वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी निवृत्त होत आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून महापालिकेचे प्रभारी अधिकारी नेमण्यात येत आहेत. अनेक महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंते नेमण्यात आले आहेत. काही निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पुढील चार ते पाच महिन्यांनंतर निवृत्तीचे प्रमाण वाढणार आहे. महापालिकेचे नियमित कामकाज सांभाळण्यासाठी अधिकारी राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. शहर अभियंतासारख्या उच्च पदावर अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेकडे अधिकारी नाही. या पदावर नियुक्ती करण्यासाठी कार्यकारी अभियंता म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव हवा असतो. वेगवेगळ्या विभागांमध्ये पदोन्नती देऊन ही रिक्त पदे भरता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ऐनवेळी प्रशासनाची कोंडी होऊ नये म्हणून आतापासूनच शासनाकडून वेगवेगळ्या पदांवर प्रतिनियुक्ती पद्धतीने अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आतापासूनच प्रक्रिया सुरू केली तर पुढील चार ते पाच महिन्यांनंतर अधिकारी महापालिकेला मिळतील, अशी अपेक्षा पाण्डेय यांनी व्यक्त केली.