राष्ट्रवादी भवन हडको, एन-११ येथे ‘कला क्षेत्रावर आलेली मरगळ’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच कलावंत नोंदणी मेळावाही झाला व कलावंतांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगकाका गायकवाड, प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर निकम,
डी. बी. जगतपुरीया, राकाँचे शहराध्यक्ष विजय साळवे, प्रा.ज्ञानदेव शिंदे, कृष्णा शरणागत, प्रा.श्वेता कल्याणकर, राजू आमराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करण्यात आलेल्या नियुक्त्या अशा : जॉन भालेराव-जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सांस्कृतिक विभाग, संजय बनसोडे-जिल्हा उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग, प्रा. गजानन साहेबराव केचे-शहर उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग, अक्षय बोर्डे-शहर संघटक सांस्कृतिक विभाग,
संतोष साहेबराव केचे-पूर्व विधानसभा अध्यक्ष सांस्कृतिक विभाग.
ऋतुजा रामदास सूर्यवंशी-मध्य विधानसभा उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग,
संदीप सुरेश टेपाळे (पश्चिम विधानसभा अध्यक्ष सांस्कृतिक विभाग,
दत्तात्रय गवारे (पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग,
डॉ.अजय वारुळे (गंगापूर तालुका उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग).
प्रवीणकुमार अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा.श्वेता कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्ञानदेव शिंदे यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना आलेले अनुभव तसेच कलावंतांच्या व्यथा मांडल्या आणि उपस्थितांचे आभार मानले.