शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

अधिकाऱ्यांची कोंडी

By admin | Published: February 17, 2016 11:45 PM

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण विभागातील अखर्चित बाचाबाची झाली़ तेव्हा काही वेळ तणाव निर्माण झाला़

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण विभागातील अखर्चित निधीवरून माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सभापती संजय बेळगे, सदस्य पुरूषोत्तम धोंडगे यांच्यात बाचाबाची झाली़ तेव्हा काही वेळ तणाव निर्माण झाला़ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा मंगला गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली़ सभेत सुरूवातीपासूनच माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले़ प्रत्येक विषयावर अधिकाऱ्यांची कोंडी करताना बेटमोगरेकर यांनी पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्या दिल्या़ त्यामुळे पदाधिकाऱ्यांची काही वेळ अडचण झाली़ महिला व बालकल्याण विभागातील अंगणवाडी बांधकामच्या १० कोटींच्या अखर्चित निधीचा विषय सभागृहात सुरू होता़ सभापती संजय बेळगे या विषयावर स्पष्टीकरण देत असताना माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केली़ या सूचनेला सभापती बेळगे यांनी विरोध दर्शविला़ सदस्य पुरूषोत्तम धोंडगे यांनीही माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला़ त्यामुळे धोंडगे व बेटमोगरेकर यांच्यात खडाजंगी झाली़ तेव्हा उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती बेळगे, स्वप्नील चव्हाण, दिनकर दहिफळे यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर हे प्रकरण शांत झाले़ दरम्यान, माजी अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी सभेच्या सुरूवातीस सभा अहवालातील त्रुटीसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला़ १४ डिसेंबर २०१५ चे दोन सभा अहवाल कसे, तसेच मनरेगाच्या ठरावावर चर्चा न होताच ते मंजूर कसे झाले, अशा प्रश्नांचा भडीमार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांच्यावर केला़़ जि़ प़ सदस्या सारिका पवार यांनी कनिष्ठ अभियंता दयानंद शिंदे यांची पंचायत समिती, हदगाव येथील प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी करत पदाधिकाऱ्यांच्या आसनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले़ सेनेचे गटनेता नागोराव इंगोले, वत्सला पुय्यड यांनीही सहभाग घेतला़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड यांनी शिंदे यांची नियमानुसार प्रतिनियुक्ती रद्द करण्याच्या सूचना दिल्या़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ सदस्य अशोक पाटील रावीकर यांनी आठ निमशिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश अनधिकृत असल्याचे सांगितले़ बेळगे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले़ समाजकल्याण अधिकारी सुधीर खमितकर यांच्या वरील कारवाई संदर्भात सदस्या मंगाराणी अंबुलगेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले़ दरम्यान, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना लाभ झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़ (प्रतिनिधी)