छत्रपती संभाजीनगर : भावा-बहिणीचे अतूट नाते, स्नेह आणखी दृढ करणारा ‘राखी पौर्णिमा’ सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे ‘राखी’त यंदा ‘मेड इन छत्रपती संभाजीनगर’ ब्रँड बनला असून सुमारे १ कोटीच्या राख्या होलसेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
५० महिला बनविताहेत राखीशहरातील ५० महिला राखी बनविण्यात एक्स्पर्ट झाल्या आहेत. यात पद्मपुरा, राहुलनगर, बजाजनगर येथील या महिला आहेत. मागील वर्षभरापासून त्या राखी बनवत आहे. मोती, खडे, डायमंडच्या नाजूक राख्या बनविण्यात त्यांनी ‘मेड इन छत्रपती संभाजीनगर’ची छाप निर्माण केली आहे.
एक महिला बनविते १२ डझन राखीमागील ५ वर्षांपासून ५० महिला राखी बनवित असून. प्रत्येक महिला दिवसभरात १२ डझन राखी तयार करीत आहे. राखी बनविणे सोपे नसून अत्यंत नाजूक काम असून, एक-एक मणी, डायमंड धाग्यात विणावा लागतो.
१५०० डिझाईनच्या राख्याराखी डिझाईनर सविता गुगळे यांनी सांगितले की, शहरात यंदा १५०० डिझाईनच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. यात फॅन्सी राख्यांचा समावेश आहे. ओरिजनल चंदन राखी, रुद्राक्ष राखी, कौडी राखी, मुलीधागा राखी, मोती राखी, गोल्ड व सिल्व्हर प्लेटेड राखी, जरदोजी, रेशीम राखी, सुती राखी, लुंबा राखीचा समावेश आहे.
आता राखीसोबत कुंकू व अक्षदाहीयंदा राखीसोबत कुंकू व अक्षदाही देण्यात आल्या आहेत. यासाठी खास छोट्या डब्यांची व्यवस्था बॉक्समध्ये करण्यात आली आहे. अशा राख्यांना महिलांकडून मागणी असून बाहेरगावी किंवा विदेशात ज्यांचे भाऊ आहेत त्यांना अशा राख्या पाठविल्या जात आहेत.
चिमुकल्यांसाठी प्रोजेक्टर राखीचिमुकल्यांसाठी यंदा प्रोजेक्टर राखी आली आहे. घड्याळासारख्या खेळणीचा खुबीने वापर राखीत करण्यात आला आहे. बटण दाबताच राखीतील प्रोजेक्टरद्वारे भिंतीवर चित्र दिसू लागते. याशिवाय टीव्ही चॅनलवरील कार्टून मालिकेतील बहुतांश पात्र राखीवर दिसत आहे. याशिवाय लाईटिंग, म्युझिक व स्पिनरच्या राख्याही बच्चे कंपनीत प्रिय होतील.