शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

अरे व्वा! तुमचा जबडा आईसारखा, दात वडिलांसारखे!

By संतोष हिरेमठ | Published: December 12, 2023 4:26 PM

अक्कलदाढ देते त्रास, वर्षभरात शेकडो अक्कलदाढा काढण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर : जन्मत: कुणाला जबड्याची रचना आईकडून आणि दातांचा आकार हा वडिलांकडून मिळतो. तर कुणाच्या जबड्याची रचना ही वडिलांकडून आणि दातांचा आकार हा आईकडून मिळतो. परिणामी, आनुवंशिक रचनेमुळे ८० टक्के रुग्णांच्या अक्कलदाढेला जागाच नसते. त्यामुळे ती वाकडीतिकडी येते आणि वेदनेमुळे ती काढावी लागते. एकट्या शासकीय दंत महाविद्यालयात वर्षभरात ३,५०० अक्कलदाढा काढण्यात आल्या.

एखाद्या व्यक्तीला शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते, त्यांना ‘अक्कलदाढ’ असे म्हटले जाते. वैद्यकीय भाषेत ‘विस्डम टीथ’ असे म्हटले जाते. अक्कलदाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा अक्कल, हुशारी आणि बुद्धीशी काहीही संबंध नसतो. त्यांच्या रचनेमुळे मात्र चांगले मौखिक आरोग्य असणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यामुळे त्या काढण्याचीही वेळ ओढवते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

...तर काढावी लागतेवर्षभरात साधारणपणे ३,२०० ते ३,५०० अक्कलदाढा काढल्या जातात. यातील काही अक्कलदाढा तोंडामध्ये उगवलेल्या असतात, तर काही अक्कलदाढा या हिरडीच्या आत असतात. अक्कलदाढा साधारणपणे वयाच्या १८ ते २२ व्या वर्षी येतात. सर्वसाधारणपणे या वयात शहाणपण येते किंवा समजू लागते म्हणून या दाढांना ‘अक्कलदाढा’ म्हणतात. प्रत्येकाची अक्कलदाढ काढावीच लागते असे नाही. रुग्णांची तक्रार असेल, अक्कलदाढेला सूज येत असेल, दुखत असेल, अक्कलदाढ वेडीवाकडी असेल तर मात्र काढावी.- डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

८० टक्के लोकांना आनुवंशिक रचनेमुळे त्रासअक्कलदाढेची समस्या असणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्रास हा आनुवंशिक रचनेमुळे होतो. कारण आनुवंशिकतेमुळे कुणाला जबड्याची रचना आईकडून आणि दाताचा आकार हा वडिलांकडून मिळतो, तर कुणाच्या जबड्याची रचना ही वडिलांकडून आणि दातांचा आकार हा आईकडून मिळतो. अक्कलदाढेची समस्या असणाऱ्यांच्या अक्कलदाढा अडकलेल्या, वाकड्या-तिकड्या असतात. त्यामुळे वेदना होत असल्याने अक्कलदाढ काढण्याची वेळ ओढावते.- डाॅ. प्रीतम शेलार, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन

- जिल्ह्यातील एकूण डेंटिस्ट- ५५०- अनेकांना वयाच्या २५ ते ३० व्या वर्षी अक्कलदाढ येते.- अक्कलदाढ काढल्यानंतर व्यक्तीला दृष्टिदोष येतो, हा गैरसमज.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद