शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सेवली येथे वृद्धाचा खून, तरूण गंभीर

By admin | Published: August 12, 2015 12:45 AM

सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे एका वृद्धाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. तर एक युवक यात गंभीर जखमी झाला आहे.

सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथे एका वृद्धाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. तर एक युवक यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.हत्येचे कारण समजू शकले नाही. मंठा तालुक्यातील भागडे सावरगाव येथील संतोबा मुंजाजी आघाम (६५) हे सेवली येथे आठवडी बाजारासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येथील दारूच्या दुकानामागे असलेल्या एका कुडाच्या घरात रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. जवळच चाकूही आढळून आला. तसेच या घराजवळच प्रकाश बागडू खंदारे (२५, रा. सेवली) हा रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी आढळून आला.या घटनेची माहिती संतोष खंदारे याने सेवली पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संतोबा आघाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. तर गंभीर जखमी असलेल्या प्रकाश खंदारे यांच्यावर सेवली येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.या घटनेमागचे नेमके कारण कळू शकले नाही. दारू व पैशाच्या वादातून भांगडे व खंदारे यांच्यात वाद झाला असावा त्यातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, घटनेची माहिती देणाऱ्या संतोष खंदारे यास पोलिसांनी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले.अधिक तपास पोलीस करीत आहेत.