वाळूजच्या साठेनगरात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध इसमाने गळफास घेतल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच, सहायक उपनिरीक्षक शेख सलीम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेतलेल्या गिरीजाराम भोंड यांना खाली उतरविले. यानंतर, पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत गिरीजाराम भोंड यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---------------------------
ज्योती गायकवाड यांची निवड
वाळूज महानगर : वाळूज पंचायत समिती सदस्या तथा माजी सभापती ज्योती अविनाश गायकवाड यांची शासनाच्या जैवविविधता समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती संदर्भात कामे करण्यात येणार आहे.
फोटो क्रमांक-ज्योती गायकवाड
-----------------------
पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात शनिवारी (दि.५) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वृक्षरोपणासह पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांत जनजागृती करण्यात आली.
सह्याद्री वृक्ष बँक
सह्याद्री वृक्ष बँक, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सिडकोतील सारा ईलाट या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबर, बजाजनगरातील खासगी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिला व बाळांना वृक्षारोपणासाठी झाडे देऊन, पुढील वर्षी बाळ व झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. या प्रसंगी सह्याद्री वृक्ष बँकेचे पोपटराव रसाळ, भाजप उद्योजक तालुका आघाडीचे अध्यक्ष हरिदास पल्हाळ, शैलेंद्र कोरे, प्रकाश कदम, रणजीत मुळे, बबन हरणे, भगवान शिंदे आदींची उपस्थिती होती.
जोगेश्वरी ग्रामपंचायत
जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच गजान बोंबले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. कार्यक्रमाला उपसरपंच प्रवीण दुबीले, अमोल लोहकरे, ग्रामविकास अधिकारी बी.एल.भालेराव, कृषी विस्तार अधिकारी व्ही.पी.पुरी, सदस्य नजीरखॉ पठाण, मीना पनाड, गणेश साबळे, विलास सौदागर, गणेश ठोकळ, प्रभाकर काजळे, मोईस शेख, कृष्णा काजळे, रामेश्वर आरगडे, पंडित पनाड, अनिल वाघ, सुरेश वाघमारे, किशोर बीलवाल, नजीर शेख, प्रवीण थोरात, योगेश दळवी आदींची उपस्थिती होती.
तीसगाव ग्रामपंचायत
तीसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सरपंच शंकुतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, सदस्य राजेश कसुरे, संजय जाधव, जगदीश शेलार, ईश्वर तरैय्यावाले, नितीन जाधव, ग्रामविकास अधिकारी ह.आर.गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- तीसगाव येथे वृक्षारोपण प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सरपंच शंकुतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे आदी दिसत आहेत.
फोटो क्रमांक- वृक्षारोपन
-----------------------