पोलिसांनी सांगितले की, शब्बीर हाजी अशरफ यांचे जुना मोंढा येथे गगण एजन्सी नावाचे दुकान आहे. लॉकडाऊन लागल्यापासून त्यांचे दुकान बंद आहे. ७ मे रोजी ते दुकानाकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता, चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून चोरी केल्याचे त्यांना दिसले. आरोपी रिक्षा घेऊन चोरी करण्यासाठी आला. यानंतर त्याने दुकानाचे शटरच्या सेंट्रल लॉकचे कुलूप असलेली फरशी तोडून लॉक उघडले. शटर उचकटले. या घटनेत ७२ हजारांचे काजू आणि तीन हजार रुपये रोख चोरून आरोपी पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी घटनास्थळी भेट दिली.
======
आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गगण एजन्सी फोडणारा आरोपी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.