शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

वाळूजला ट्रकने वृद्धेला चिरडले

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र थांबण्यास तयार नाही. सोमवारी सकाळी भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या आणखी एका अनोळखी ६० वर्षीय महिलेला चिरडले.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघात सत्र थांबण्यास तयार नाही. सोमवारी सकाळी भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या आणखी एका अनोळखी ६० वर्षीय महिलेला चिरडले. या अपघातात तिचा मृत्यू झाला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नगरकडून औरंगाबादकडे ऊसतोड मजुराचे बैल घेऊन एक ट्रक (क्र. एमएच- १२- ७१६५) भरधाव वेगाने जात होता. वाळूज येथे हा ट्रक पोहोचला. त्यावेळी लायननगरकडून बाजारतळाकडे एक अनोळखी ६० वर्षीय महिला रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी सुसाट वेगाने आलेली ही ट्रक या महिलेला धडकली. या धडकेने ही अनोळखी महिला दुभाजकाजवळ गंभीर जखमी होऊन पडली. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे फौजदार संजय बनकर, पोहेकॉ. बाबासाहेब मोटे, पोकॉ. व्यवहारे, पोकॉ. रवी कुलकुर्णी, पोकॉ. मराठे, पोकॉ. वैष्णव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मग नागरिकांच्या मदतीने त्या अनोळखी महिलेस गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. दरम्यान, या अपघातात मरण पावलेल्या अनोळखी महिलेची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात फरार ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. हिवाळे करीत आहेत.दरम्यान, या मार्गावर औरंगाबाद ते वाळूज पट्ट्यात गेल्या तीन महिन्यांपासून अपघाताचे सत्रच सुरू आहे. तीन महिन्यांत आठ जणांचा बळी गेला आहे.