- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : काय, तुम्ही धान्य खरेदी केले? ते साठविण्यासाठी तुम्हाला पत्र्याची कोठी पाहिजे? जरा थांबा. अहो, धान्य साठविणेही आता महागले आहे. कारण पत्र्याच्या कोठीच्या भावात जबरदस्त वाढ झाली आहे. यंदा धान्य महाग व कोठीही महाग झाल्याने वार्षिक धान्य खरेदी करावे की नाही, असाच प्रश्न ग्राहकांना पडला आहे. याचा परिणाम मोंढ्यातही दिसून येत आहे.
पत्रा वधारला‘मार्च ते मे’दरम्यान वार्षिक धान्य खरेदी केली जाते. यंदा धान्याचे भाव कडाडले आहेत. एवढेच नव्हे, तर धान्य साठवून ठेवण्यासाठी पत्र्याच्या कोठीचा वापर केला जातो, त्या कोठ्याही महागल्या आहेत. कोठ्या बनविण्यासाठी जीआय पत्र्याचा वापर केला जातो. मागीलवर्षी जीआय पत्रा ७० रुपयांना मिळत होता. तोे वधारून १३० रुपयांनी मिळत आहे. कलर कोटिंग पत्र्याचे भाव ८० रुपयांहून १४० रुपयांवर गेले.
कोठी महागलीकोठी १७ जानेवारीचे भाव १७ एप्रिलचे भाव१) १ क्विंटलची कोठी ६०० रु. ---- ९५० रु.२) दीड क्विंटल कोठी ९०० रु. -----१४०० रु.३) २ क्विंटल कोठी १२०० रु. -----१८०० रु.४) ३ क्विंटल कोठी ३००० रु. ----४५०० रु.५) ५ क्विंटल कोठी ४२०० रु. ---७००० रु.
दीड, दोन क्विंटलच्या कोठ्यांना मागणीफ्लॅटमध्ये मर्यादित जागा असते. यामुळे धान्य साठवणुकीसाठी छोट्या कोठ्यांना मागणी असते. दीड ते दोन क्विंटलच्या कोठीची येथे मागणी असते.
जम्बो कोठ्यांचे खरेदीदार शेतकरीशेतकरी त्यांच्याकडील धान्याचा साठा करण्यासाठी ३ क्विंटल, ५ क्विंटल, ६ क्विंटल धान्य मावेल, अशा जम्बो कोठ्या खरेदी करतात.
ग्राहकांनी पाठ फिरवलीमोंढ्यात पत्र्याच्या कोठ्या बनविणारी सुमारे १२ दुकाने आहेत. दरवर्षी ‘जानेवारी ते मे’ या हंगामात सुमारे १ हजार कोठ्यांची येथे विक्री होते. यंदा आतापर्यंत ३०० पेक्षा कमी कोठ्या विकल्या गेल्या आहेत. भाववाढीचा फटका विक्रेत्यांना बसला आहे.- सर्वेश सदावर्ते,दुकानदार
महिन्याला धान्य खरेदी करणेच योग्यआम्ही फ्लॅटमध्ये गुढीपाडव्याला राहण्यासाठी गेलो. वार्षिक खरेदीसाठी गेलो. धान्य तर महाग आहेच; आता कोठ्यांचे भाव पाहून चक्रावलो. शेवटी आम्ही निर्णय बदलला. महिनाभर पुरेल एवढेच धान्य खरेदी करायचे ठरविले.- स्वाती वैजापूरकर, उल्कानगरी